कु. प्राजंल राहुल बडगुजर, पुणे हिचे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत विशेष कामगिरी करत संघाला केले विजयी – श्री. राजेंद्र वसंत बडगुजर, पुणे

पुणे येथील कुमारी प्रांजल राहुल बडगुजर हिने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत विशेष कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कु. प्रांजल ही पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक, ज्येष्ठ समाज सेवक बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेचे माजी अध्यक्ष, पुणे येथील बडगुजर समाजाचे खंबीर नेतृत्व कै. प्रकाश रघुनाथ बडगुजर यांची नात, नर्मदा ऑफसेटचे विद्यमान डायरेक्टर श्री. राहुल प्रकाश बडगुजर यांची सुकन्या आहे.

पुणे सिंहगड रोडवरील ऑलपीकवीर खाशाबा जाधव क्रिडा निकेतन च्या ग्राऊंडवर झालेल्या ZP मॅचेस मध्ये मागील विजय परंपरा कायम ठेवत याही वर्षी मिलेनियम स्कूलच्या मुलींनी U/14 गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामना हा मिलेनियम VS रेणुका स्वरूप स्कूल यांच्या मध्ये झाला, या अटीतटीच्या सामन्यांमध्ये मिलेनियम स्कुलच्या मुलीने उत्तम खेळ करत हा सामना 10-12 अश्या गुणांनी जिंकला.

या स्पर्धेच्या अंतिम चुरशीच्या सामन्यात मुलींच्या गटात “मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर, पुणे” च्या संघाने “प्रथम क्रमांक” पटकावून वर्चस्व स्थापित केले. ह्या स्पर्धे वेळी अंतिम सामना हा “मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर, पुणे” विरूद्ध “रेणुका स्वरूप स्कूल” यांच्यामध्ये झाला . मिलेनियम नॅशनल स्कूल ने 10-12 अशा गुणांनी हा सामना जिंकला. पहिल्या फेरीत – मिलेनियम च्या मुली डिफेन्स करताना आर्या नाईक – 2min, प्रांजल बडगुजर – 2min, साची वाघ – 2min, रेवा देव 1min, तर दुसरा डाव मिलेनियम च्या मुली डिफेन्स करतांना आर्या नाईक – 3min, प्रांजल बडगुजर – 1min,
साची वाघ – 2min, संचिता इनामदार – 1, वरील मुलींच्या खेळाच्या जोरावर तसेच सर्व मुलींनी अटॅक मध्येही चांगली कामगिरी केल्यामुळे हा सामना जिकला.
मिलेनियम स्कूलच्या खेळाडूंचा अटॅक अगोदर पासूनच चांगल्या प्रकारे असल्यामुळे रेणुका स्कूल संघाचे 12 गडी बाद झालेत.

कु. प्रांजल राहुल बडगुजर तसेच टिम मधील खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा मेडल व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आले.

पंजाब येथे होणाऱ्या नॅशनल कॉम्पिटिशन 2022-23 मध्ये अशीच कामगिरी करून पुणे व महाराष्ट्राचे नावलौकिक करण्यासाठी आशीर्वाद दिलेत.

बडगुजर. इन टिमकडून कु. प्राजंल हिस हार्दिक अभिनंदन व पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*