“बाबा” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

बाबा

बाबा एक जन्मदाता
बाबा एक ज्ञाता
सदासर्वकाळ .

बाबा एक माऊली
बाबा एक सावली
सदा हिरवीगार ..

बाबा एक आधार
बाबा एक निर्धार
सदा अविचल ……

बाबा एक मित्र
बाबा एक स्तोत्र
सदा मंगलच…..

बाबा एक जेष्ठ
बाबा एकनिष्ठ
मुलांसाठी..

बाबा एक पर्व
बाबा म्हणजे सर्व
मुलांचेच …

बाबा एक धार
बाबा एक पार
सावलीला..

बाबा एक धारा
बाबा एक किनारा
जीवनाचा………

बाबा एक डोह
बाबा एक प्रवाह
दूर प्रवासाचा…..

बाबा एक कर्म
बाबा एक धर्म
जगावेगळा…..

बाबा एक दबदबा
बाबा एक धबधबा
उत्साहाचा……

बाबा एक कळकळ
बाबा एक धावपळ
सदोदित

बाबा एक विश्वास
बाबा एक विकास
मुलांचाच …..

बाबा एक दिग्दर्शक
बाबा एक दिपस्तंभ
दूर प्रवासाचा.

बाबा एक झिजणे
बाबा एक चांदणे
पिलांसाठी

बाबा एक गाथा
तिथे टेकवावा माथा
क्षणोक्षणी…

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*