धुळे - येथील क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्थेच्या सभा मंडपात दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री. आनंदा धोंडू सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या कार्यकारिणीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यात विविध विषयांवर विचार विनिमय करून निर्णय घेण्यात जाहीर करण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला आई चामुंडा मातेचे पूजन करण्यात आले. देशाच्या सीमेवर शहीद झालेले सैनिक, विविध देशातील मान्यवर व समाजातील दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेला सचिव प्रा. हिरालाल बुडगुजर यांनी सुरुवात केली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, जमाखर्चास मंजुरी देणे, लेखा परीक्षण अहवाल मंजूर करणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, नवीन आजीवन सभासदास मंजुरी देणे, वार्षिक सर्वसाधारण मिटींगचे आयोजन करणे; याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
यावेळी अध्यक्ष व सचिव यांच्यासह माजी अध्यक्ष श्री. उमेश करोडपती, माजी अध्यक्ष श्री. माधवराव बडगुजर तसेच उपाध्यक्ष श्री. दिलीप बडगुजर, सहसचिव श्री. भालचंद्र साळुंखे, खजिनदार श्री. पी.डी. बडगुजर, संघटक श्री. सुधीर बडगुजर आणि कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
महासमितीच्या विविध समित्या व विषय समित्या यांची रचना करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. प्रादेशिक, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर संघटनात्मक समित्या स्थापन करण्याबाबत संघटक श्री. सुधीर बडगुजर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर विषय समिती प्रमुखांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
विषय समित्यांत सलोखा समिती प्रमुख श्री. सुरेश महाले, शिक्षण समिती प्रमुख श्री. पी.डी. बडगुजर, समाजकल्याण - ओबीसी समिती प्रमुख श्री. धर्मेंद्र बडगुजर, वधू-वर परिचय व सामूहिक विवाह समिती प्रमुख श्री. लिलाधर बडगुजर, महिला समिती प्रमुख सौ. भावनाताई बडगुजर, युवा कल्याण समिती प्रमुख श्री. लोकेश कोतवाल, आरोग्य समिती प्रमुख डॉ. उमेश बडगुजर व उद्योजकता विकास समिती प्रमुख श्री. विजय बडगुजर यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. तसेच प्रसिद्धी समितीची रचना करण्यात आली असून त्यात पाच सदस्यांचा समावेश राहील.
महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील प्रातिनिधिक सहभाग अधोरेखित व्हावा, यासाठी निमंत्रित सदस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच या समितीने निर्णय घेण्याबाबत ठराव करण्यात आला.
आयत्या वेळच्या विषयात उपाध्यक्ष श्री. दिलीप बडगुजर यांचा आलेला राजीनामा सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. दुसरा विषय अमळनेर येथील श्री. रवींद्र बडगुजर व कन्हैयालाल बुडगुजर यांनी वधू-वर परिचय पुस्तिका छापण्याबाबत प्रस्ताव मांडला व तो मंजूर करण्यात आला.
तिसऱ्या विषयांतर्गत चामुंडा माता मिशन लोहारी येथील शिष्टमंडळाने कार्यकारिणी सभेत प्रस्ताव मांडला. त्यानुसार अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन भरविण्याचा मानस असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी 8 जानेवारी 2022 रोजी लोहरी येथे येण्याचे निमंत्रण स्वीकारल्याचे निवेदन श्री. नरेंद्र बडगुजर यांनी केले. याबाबतीत दिनांक 11 डिसेंबर 2022, रविवारी रोजी पारोळा येथे नियोजन सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महासमितीच्या कार्यकारणी सभेस वरील मान्यवरासह श्री. राजेंद्र पवार, श्री. विकास बडगुजर, श्री. निलेश बडगुजर, श्री. प्रवीण बडगुजर, श्री. राजेंद्र नंदवालकर, श्रीमती सुरेखा बडगुजर हे सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply