सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने जळगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात भारताचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह चे गृहपाल श्री एस आर पाटील, जितेंद्र धनगर, श्री बोरसे श्रीमती वैशाली पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते डॉ.नितीन बडगुजर यांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर समाज कल्याण विभागाचे मुलांचे वस्तीगृहाचे गृहपाल श्री एस आर पाटील यांनी स्वागत केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना श्री जितेंद्र धनगर यांनी समता पर्वच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला व कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तरपणे सादर केली. याप्रसंगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली. मुख्य कार्यक्रमांतर्गत लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय येथील प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधतांना, “भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून, भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करावा. त्याद्वारेच संविधानाचा योग्य सन्मान होईल” असे सांगतानाच, “भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे संरक्षणच देत नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे बळ देखील देते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येकाला समोर ठेवून संविधानाची निर्मिती केली आहे आणि त्याचा आपण सन्मान राखला पाहिजे” असे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र धनगर यांनी तर आभार प्रदर्शन वसतिगृहातील विद्यार्थी शुभम यांनी केले.
फार छान कार्यक्रम . छान मार्गदर्शन