माणसे जाेडणारे शांत, संयमी कै. भास्कर डिगंबर बडगुजर
अण्णा, तुमचे असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते. आज सर्व काही असण्याची जाणीव आहे; पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे. ती उणीव कधीच भरुन निघणार नाही. अशा आमच्या प्रेमळ अण्णांना भावपूर्ण श्रध्दांजली…
शांत, संयमी, आदर्श असे व्यक्तीमत्व म्हणजे आमचे बाबा कै. भास्कर डिंगबर बडगुजर हे हाेय. बाबांच्या अचानक जाण्याने प्रत्येकाला माेठा धक्का बसला अाहे. त्यांच्या सुंदर अाठवणीमुळे ते आज देखील आमच्या साेबतच काेणत्याना काेणत्या रुपाने असल्याचा भास हाेत अाहे. बाबांचा जीवनपट हा खूप प्रेरणादायी व आदर्श असा अाहे. साधी राहणी व उंच विचार हे त्यांच्या जीवनाचे खास वैशिष्टे हाेते. अण्णाचा जन्म दि. १०/०८/१९४२ साली एकचक्रनगरी अर्थात एरंडाेल (जि. जळगाव ) येथे झाला. त्यांचे शिक्षण जुन्या मॅट्रीकपर्यंत झाले हाेते. अण्णा शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करीत हाेते. अशातच त्यांना जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यायात शिक्षक म्हणून नाेकरी मिळाली हाेती; पण त्या ठिकाणी त्यांचे मन रमले नसल्याने कालातंराने त्यांनी ती नाेकरी साेडून पुन्हा आपल्या शेती या व्यवसायाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले. अण्णाचे लग्न हे लहानपणीचे ठरले हाेते. दि. २८/५/१९६४ साली त्यांचा विवाह चाेपडा येथील कै हिरालाल ताेतारामशेठ बडगुजर यांची मुलगी ताराबाई यांच्याशी झाला. अण्णा परिवार सर्वात माेठे असल्याने त्यांच्यावर खूप माेठी जबाबदारी हाेती; पण त्यांनी काेणतीही तक्रार न करता ही जबाबदारी अगदी आनंदाने चांगली पद्धतीने सांभाळली. भाऊ व बहिणींच्या प्रत्येक सुख-दु:खात ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांना काेणतीही अडचण येऊ नये म्हणून तळहाताच्या फाेडाप्रमाणे जपले. शेती व्यवसायात कुटुंबाचा गाडा चालविणे अवघड झाल्याने ते वडील व भावासाठी मुंबई येथे कामासाठी गेले हाेते. तेथे त्यांनी मिळेल ते काम केले वेळप्रसंगी वडा-पाव खाऊन त्यांनी दिवस काढले. काही दिवसांनी त्यांनी लहान भाऊ सुरेश व प्रकाश बडगुजर यांना देखील मुंबईत नेऊन त्यांना चांगल्या ठिकाणी नाेकरीस लावले. त्यानंतर पुन्हा शेतीचा व्यवसाय सांभाळण्यासाठी एरंडाेल येथे आले. अण्णांच्या या चांगल्या, वाईट जीवन प्रवासात आजी ताराबाई यांची माेलाची साथ लाभली आहे. अण्णाना तीन मुले व एक मुलगी हाेती. त्यांना देखील त्यांनी चांगले शिक्षण संस्कार दिले. आण्णांचे माेठे चिरजीव दिनेश बडगुजर हे एंरडाेल नगरपालिकेत पाणीपुरवठा अधिकारी हाेते. त्यांनी सेवानिवृत्ती घेऊन आज श्री माेटर्स नावाने स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. दुसरा मुलगा जयंत बडगुजर हे सध्या एरंडाेल नगरपालिकेत पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहे. तर तिसरा मुलगा उदय बडगुजर यांनी श्रद्धा फुट वेअर या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. मुलगी निलिमाताई यांचा विवाह मुदाणेकर व सध्या धुळे येथे राहणाऱ्या पुंडलिक शहादूशेठ बडगुजर यांच्याशी झाला आहे. निलिमाताई या देखील अण्णाप्रमाणे शांत, संयमी व प्रेमळ असल्याने त्यांनी माहेरी व सासरी आपल्या याच स्वभावामुळे नावलाैकिक मिळविला आहे. अण्णाचे माेठे चिरंजीव दिनेश बडगुजर यांचा विवाह पिंपळकाेठा येथील दिलीप पाेपटशेठ बडगुजर यांची कन्या वंदना बडगुजर यांच्याशी, दुसरा मुलगा जयंत बडगुजर यांचा विवाह पाचाेरा येथील रमेश धाेंडूशेठ बडगुजर यांची मुलगी आशा बडगुजर यांच्याशी तर तिसरा मुलगा उदय बडगुजर यांचा विवाह पाचाेरा येथील रमेश धाेंडूशेठ बडगुजर यांची मुलगी छाया बडगुजर यांच्याशी झाला आहे. अण्णांना सिंध्दात दिनेश बडगुजर, उपासना जयंत बडगुजर, साैरव जयंत बडगुजर, गाैरव उदय बडगुजर, गाेविंद दिनेश बडगुजर, हर्षल उदय बडगुजर, साेनी पुंडलिक बडगुजर, पाैर्णिमा पुंडलिक बडगुजर, साई पुंडलिक बडगुजर, श्री सिद्धांत बडगुजर असे सहा नातू, तीन नात, एक पणतू आहे. हे सर्व उच्च शिक्षण घेत असून बाबाचा आदर्श ठेवून करिअर करीत आहे. अण्णांचे या नात-नातूवर खूप प्रेम हाेते. त्यामुळे ते त्यांच्यासाेबत नेहमी हसत-खेळत राहत हाेते. अण्णाच्या माेठ्या नातू सिद्धांत याचा विवाह धुळे येथील जागृती बडगुजर हिच्याशी तर नात उपासना (राणी) हिचा विवाह नाशिक येथील कै. रमेश रघुनाथ बडगुजर यांचे चिरंजीव साेहन रमेशशेठ बडगुजर यांच्याशी झाला आहे. अण्णांना १९९२ या वर्षी पहिला हदयविकाराचा झटका आला हाेता. त्यावेळी त्यांचे कुटुंब चांगेल हादरले हाेते; पण अण्णांनी या संकटावर मात करुन विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी याेगाचा ध्यास धरला. सकाळी ४ वाजेपासून त्यांची दिनचर्या सुरू असेत. ते नियमित याेगा व फिरण्यास जात असल्याने त्यांनी प्रकृती ही ठणठणीत हाेती. याेगाच्या माध्यामातून त्यांनी अनेक जेष्ठा नागरिकांचा गाेतावळा जाेडला. त्यानंतर ते सुर्यैदय ज्येष्ठ नागरिक संघात जुळले. या ठिकाणी त्यांनी केलेले कार्य लक्षवेधी असेच हाेते. ६ फेब्रुवारी २०२२ राेजी त्यांचा ब्रेन हॅमरेज झाला. त्यामुळे त्यांना तात्काळ जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांचे डाेक्याचे ऑपरेशन झाले. त्या दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली हाेती. प्रत्येक दिवस ते हा त्यांचा मृत्यूशी झुंज देणारा असाच हाेता. या काळात त्यांची पत्नी, मुले, सुना व नातवंडे यांनी चांगली सेवा केली. त्यांना काेणतीही गाेष्टीची कमी पडू दिली नाही. त्यांना जगण्याची खूप इच्छा हाेती पण नियतीला ते मान्य नव्हते म्हणनू दि. २३/११/२०२२ राेजी रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. अण्णांनी दिलेले संस्कार हे कधीच विसरता येणार नाही. अशा प्रेमळ बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली.
आपली नात
~उपासना सोहनशेठ बडगुजर, पुणे
मो. ७५८८८१३०९८
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻