कुर्हे पानाचे येथे रा. घो. माध्यमिक विद्यालयात संविधान दिनी सामूहिक शपथ, शिक्षणामुळे उत्तम नागरिक घडावे, यावेळी संविधानाचे पूजन व वाचन करून तसेच संविधानाप्रमाणे वागण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली श्री एकनाथ बडगुजर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून तसेच संविधानाप्रमाणे वागण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. संविधानाचे घोषणा वाक्य म्हणून घेतले. मुख्याध्यापक आर. व्ही. गवळी, पर्यवेक्षक एम. डी. वाघ, श्री. एस. बी. बडगुजर, श्री. सुदर्शन बडगुजर, श्री. आर.एस बडगुजर, श्री.एम. एन. चव्हाण, श्री.एल. पी. पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन हे डी. ए. सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य म्हणजे स्वेराचार अचार नव्हे, तसेच फक्त नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेऊ नका शिक्षणातून उत्तम नागरिक घडले पाहिजे, आई, वडील शिक्षक थोरामोठ्याचा आदर करा. संविधानाचे वाचन करून त्याप्रमाणे वागा असे आवाहन ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.एकनाथ बडगुजर यांनी केले.
Leave a Reply