“ल्युमॕक्स आॕटो टेक्नॉलॉजीज् लिमीटेड,औरंगाबाद” या सुप्रसिध्द कंपनीचे असिस्टंट मॕनेजर श्री.कल्पेश मनोहर बडगुजर, यांचे व टीमच्या अथक प्रयत्नांना सुयश – श्री. सुनील बडगुजर, औरंगाबाद

औरंगाबादः येथील “ल्युमॕक्स आॕटो टेक्नॉलॉजीज् लिमीटेड,औरंगाबाद” या सुप्रसिध्द कंपनीचे असिस्टंट मॕनेजर श्री.कल्पेश मनोहर बडगुजर, यांचे व टीमच्या अथक प्रयत्नांना सुयश तथा अभिनंदनीय फळ लाभले. जगप्रसिध्द “आंतरराष्ट्रीय गुणवत्ता नियंत्रण मंडळांचे अधिवेशन,जकार्ता,इंडोनेशिया. {ICQCC Jakarta} येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात श्री. कल्पेश मनोहर बडगुजर यांचे टीमला प्राइम गोल्ड अवार्ड देऊन गौरविणेत आले. श्री.कल्पेश बडगुजर हे, कै. मनोहर दशरथ बडगुजर व श्रीमती.सुरेखा मनोहर दशरथ बडगुजर (मूळगाव मारवड ता.अमळनेर) यांचे सुपुत्र तथा सौ.प्रियंका कल्पेश बडगुजर चे पती असून सर्वसाधारण कुटूंबातील व्यक्तीमत्वाने स्वतःच्या कंपनीत व परीवारात महाआनंदाचा क्षण आणला,त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,बडगुजर प्रॉऊड गृप,बडगुजर.इन टीम,मारवड तथा औरंगाबाद बडगुजर समाजातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व येथून पुढेही जागतिक पातळीवर मोठे यश मिळो ही शुभेच्छा.
ll🌹🙏शुभम् भवतु🙏🌹ll


1 Comment

  1. Congratulations to Mr.Kalpesh Manohar Badgujar & Parents💐💐👌

Leave a Reply

Your email address will not be published.


*