बालदिनानिमित्त… “हरवलेले बालपण” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा*

बालदिनानिमित्त…

“हरवलेले बालपण”

वेळ बदलली, अपेक्षा वाढल्या
अपेक्षा वाढल्या, शौक वाढले
शौक वाढले, खर्च वाढला
20 वर्षांचा होईपर्यंत मोबाईल काय आहे हे माहीत नव्हतं,
आता 5 वर्षाच्या मुलांना पर्सनल मोबाईल आहे !
एक रुपयात 16 लेमन गोळ्या मिळायच्या, त्यात आनंद होता.
सायकल भेटली तर हेलिकॉप्टर भेटलं असा आनंद असायचा,
आता 11/ 12 वर्षाच्या मुलांना स्कुटी आहे तरी समाधान नाही.
काय चुकतंय? काय हरवलयं? ते शोधायला हवं,
कुठे गेले बालपण? का हरवलयं बालपण?
याला जबाबदार कोण? आई? बाबा? की मुलं?
बदलले आहेत आई-बाबा, त्यांची मुलांबाबतची कल्पना! त्यांच्या मुलांकडूनच्या अपेक्षा! त्यांची मुलांचे लाड करण्याची पद्धत! आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे मुलं सुद्धा बदलली आहेत, नाही का?
बदलल्या आहेत पैसा कमवण्याच्या पध्दती, तो खर्च करण्याच्या पद्धती, त्याचा आनंद घेण्याच्या पद्धती आणि एकंदरीत समाधान, ते कुठेच नाही नाही!
जर विचार केला तर साधे सोपे उत्तर मिळेल,
प्रत्येक घरात किमान 5 सिम कार्ड आहेत म्हणजे 500 रु किमान रिचार्ज आहे,
प्रत्येक घरात सरासरी 4 मोबाईल किमान झाले आहेत…
म्हणजे वार्षिक खर्च अंदाजे 20 ते 40 हजार झाला आहे,
गणित कमवण्यात चुकतंय का गमवण्यात हे शोधायला हवं !
दिवाळी आणि उन्हाळा दोन वेळा येणारे कपडे आता एका वर्षात दर महिन्याला खरेदी होत आहेत.
बघा आणि शोधा, कमवण्यात बदल झालाय की गमवण्यात !
आपण सर्वच या चक्रव्यूहात सापडलो आहोत. अगदी मी स्वतः सुद्धा याला अपवाद नाही !
म्हणूनच म्हणतोय, चला या बालदिनापासून आपणही लहान होऊया! आणि लहान मुलांचे काय स्वप्न असतात ती पाहूया! चला समजून घेऊ लहान मुलांचे बालपण! त्यांना हवा असतो आई-वडिलांचा सहवास, आई-वडिलांचे प्रेम आणि माया! त्यांना हवे असते आई-वडिलांची हितगुज, गप्पागोष्टी आणि गाणी सुद्धा! त्यांना हवे असतात त्यांचे बोबडे बोल ऐकणारे कुणीतरी आणि त्यांना कुरवाळणारे मऊ मऊ हात! यातील काही आपण देतो का? जरा आठवून पहा, येता जाता आपल्या हातात मोबाईल असतो आणि चुकून एखाद्या वेळेस बाळ समोर आलेच तर आपण त्याच्याही हातात मोबाईल देऊन मोकळे होतो. त्याच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होण्यापेक्षा एखादं खेळणं देऊन त्याच्याबरोबर खेळायला हवं किंवा आपणच त्याचं खेळणं व्हायला हवं! म्हणजे आपोआपच आपले बालपण आपल्याला आठवेल, भुरळ घालेल, आनंद देईल, आनंद घेता येईल, सर्वत्र आनंदी आनंद होईल. नाही का?? नाही तर मला तर भीतीच वाटते, जर असे झाले तर…..

वाटते लहानच मूल व्हावे
आईच्या कुशीत दडावे
अंगाई गीत ऐकताना
मस्त झोपूनच रहावे.

वाटते इवलींशी चिमणी व्हावे
झाडांच्या फांदयावर झुलावे
चिवचिव करीतच मी
स्वच्छंद सगळीकडे उडावे

वाटते एक फूल व्हावे
झाडावरच झुलत रहावे
सुगंध देता इतरांना
स्वतःलाच मिटून घ्यावे

वाटते एक फुलपाखरू व्हावे
या फुलावर त्या फुलावर
बागडता – बागडता
मधुर रस घेत रहावे

वाटते मला पाणी व्हावे
इकडे तिकडे वहात रहावे
वाहता वाहता वाटेवरती
इतरांस निर्मळ-शीतल करावे

वाटते एक झाडच व्हावे
वसंत ऋतूत बहरून यावे
सावली देता देता इतरांना
आपणही थोडे मोठे व्हावे

वाटते कधी मोठे न व्हावे
अपेक्षांच्या खाली ते दडपणे
ओझे ते पेलता – पेलता
नको ते मोठे होणे
आणि कोलमडून पडणे

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*