भुसावळ येथील श्री. उमाकांत रामलाल दोडे हे शिरपूर येथील श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, अ. भा . बडगुजर समाज महासमिती कार्यकारिणी सदस्य , धुळे येथील जेष्ठ समाजसेवक श्री. जगदीश सिताराम बडगुजर तसेच एरंडोल येथिल प्रसिद्ध पेंटर व नवोदय युवक मंडळाचे कार्यकर्ते श्री. जितेंद्र वसंत बडगुजर यांचे व्याही आहेत . बुरहानपूर येथील सांसद प्रतिनिधी , सकलपंच बडगुजर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष व अ भा . बडगुजर समाज महासमिती विद्यमान सदस्य व माजी संघटक श्री हिरालाल गुलाबराव दोडे यांचे बंधू आहेत.
हरी ओम बाबा श्री. उमाकांत रामलाल दोडे हे नियत वयोमानानुसार वयाच्या ६० व्या वर्षी लोकोशेड वर्कशाप मध्ये ३८ वर्षे सेवाकरून सेवा निवृत्त झाले. रेल्वे मध्ये Electric Locomotive (विद्युत लोको POH भुसावळ येथूनMCM पदावरून सेवा निवृत्त झाले . त्यांच्या निरोप समारंभ भुसावळ येथील वर्कशॉप व असेंब्ली हॉल येथे उत्साहाने साजरा करण्यांत आला. त्याबद्दल त्यांचा सत्कार रेल्वे अधिकारी व कर्मचारी तसेच रेल्वे युनियन यांनी शाल श्रीफळ , बुके ‘ पुष्पहार ड्रेस साडी व मोठी सूटकेस देऊन कर्मचाऱ्यां तर्फे भव्य सत्कार करण्यांत आला. रेल्वे अधिकारी श्री . राजेश कुमार बहल यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके व पुष्पहार देऊन सत्कार करण्यांत आला व Mono Sybol रेल्वेचा तसेच कागद पत्र्यांची फाईल सुपूर्द करण्यांत आली. २ तास लोकोशेडमध्ये फिरून रेलवे इंजिनचे सर्व spare parts साफ करून टेस्टींग करून Assembling करणासाठी पाठवून रेलवे इंजिन Testing करण्यांत येते नंतर ते वापरण्यासाठी दिले जाते. हे काम फार जोखमीचे असून थोडेसेही दुर्लक्ष झाले तर मृत्यूलाच आमंत्रण अशा या बिकट परिस्थीतीत त्यांनी ३८ वर्षे सेवा केली. या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांना किरकोळ दुखापती झाल्या परंतु ते बचावले . त्यांच्या खात्यात ४ लोकांचा कामावर असतांना मृत्यू झाला. हे अवघड काम त्यांनी ३८ वर्षे केले.
दि १.११.२०२२ रोजी श्री. उमाकांत रामलाल दोडे यांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी त्यांचे पिताश्री रामलाल देवचंद दोडे होते . प्रास्ताविक श्री. चंद्रशेखर धर्मेंद्र बडगुजर यांनी केले. याप्रसंगी श्री . धर्मेंद्र पोपटराव बडगुजर शिरपूर श्री . जगदिश सिताराम बडगुजर धुळे. श्री. जितेन्द्र वसंत बडगुजर एरंडोल . भुसावळ शहर बडगुजर समाज मंडळ अध्यक्ष श्री. सुरेश महाले व सर्व कार्यकारीणी श्री. हिरालाल गुलाबराव बडगुजर बरहानपूर, श्री. चंद्रशेखर नामदेवराव भेरडे . डोंबिवली, श्री. महेंद्र धर्मेंद्र बडगुजर, श्री. चंदशेखर धर्मेंद्र बडगुजर, श्री . लकी जगदिश बडगुजर, सिनेस्टार
श्री. भावेश बडगुजर नाशिक, श्री. संजय पंडीत बडगुजर कल्याण, श्री. कल्पेश जीवन बडगुजर साकळी, श्री. राजेश पवार वाघोदा, श्री. संजय शुक्ला कालामुखी, पुजारी बाबा मुक्ताईनगर मंदिर श्री . राजूभाई स्टेट ब्रोकर मुंबई, श्री. योगेश हिरामण बडगुजर – पिंपळगांव हरेश्वर . श्री. देवानंद मुरकुटे डहाणू, श्री. सुभाष मोहन भवरे . भुसावळ श्री . नारायण उखर्डू बडगुजर व सर्व नातेवाईक मंडळी , मित्रपरीवार’ रेल्वे कर्मचारी ‘ व अनेक हितचितंकांनी त्यांचे – आहेर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी सौ . स्वाती लकी बडगुजर पुणे , सौ . पूनम रितेश दोडे पुणे श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर शिरपूर . श्री. सुरेश महाले यांनी मनोगत व्यक्त केले त्यांच्या कार्याबद्दल माहीती दिली . त्यांच्या कुटूंबात असणारा प्रेमभाव हा उल्लेखनिय आहे . श्री संतोष रामलाल दोडे . केटरर्स . भुसावळ . श्री गजानन रामलाल दोडे प्रसिद्ध कुशन मेकर स्वतः श्री उमाकांत शेट हे आई वडीलांसह एकत्र राहतात . श्री राजेश रामलाल बडगुजर हे फैजपुरला केटरींगचा व्यवसाय करतात . श्री. उमाकांत शेट यांनी आपल्या कुटूंबास एकत्रित ठेवून मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत . आजही त्यांचा शब्द कुटूंबात अंतिम असतो .
आपुलकी , प्रेम , जिव्हाळा , आदरातिथ्य त्यांच्या कुटूंबाकडून शिकण्या सारखे आहे. सेवानिवृत्ती नंतर त्यांचे उर्वरीत आयुष्य सुखाचे , समृद्धीचे , आरोग्यपूर्ण व भरभराटीचे जावो . अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. बडगुजर. इन टिमकडून श्री. उमाकांत बडगुजर यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
Leave a Reply