सोनूशेलू चामुंडा माता मंदिरावर होम हवन व भव्य रक्तदान शिबिर संपन्न- श्री. धर्मेश बडगुजर, सुरत


सोनूशेलू येथील जागृत देवस्थान आई कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या मंदिरावर नवरात्र निमित्ताने अष्टमीला होमवहन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावर्षी होम पूजा युवा नेते वैभव निकम, गोपाल बडगुजर, नितीन बडगुजर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
तसेच चामुंडा माता ट्रस्ट हे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. यावर्षी निर्णय ब्लड बँक धुळे यांच्या सहकार्याने अष्टमीनिमित्ताने भव रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रक्तदान केल्याने आपले आरोग्य सुदृढ व चांगले असते व रक्तदान हे महादान असून मोठे कार्य आहे. ग्रामीण भागात याविषयी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.असे मार्गदर्शन व आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. तसेच महिलांनी देखील रक्तदानाच्या या महान कार्यात सहभाग नोंदवला. 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी जि प उपाध्यक्ष प्रतिनिधी व गटनेते कामराज भाऊसाहेब निकम जि प सदस्य महावीर रावळ जि प सदस्य देविदास बोरसे युवा नेते वैभव निकम पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे अखिल भारतीय बडगुजर समाज उपाध्यक्ष दिलीप बडगुजर विजय बडगुजर सरपंच महेंद्र पवार सवाई मुकटी सरपंच मनोज पाटील सोनशेलु सरपंच प्रियंका बडगुजर, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपसरपंच राहुल राजपूत, दिलीप गिरासे दुर्गेश तिवारी चामुंडा देवी ट्रस्टचे अध्यक्ष धीरज बडगुजर उपाध्यक्ष भाईदास बडगुजर सदस्य दिलीप बडगुजर रविंद्र बडगुजर महेंद्र बडगुजर रमेश बडगुजर किशोर बडगुजर दंगल बडगुजर राजेंद्र बडगुजर दिगंबर बडगुजर व परिसरातील सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी व दर्शनासाठी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित भाविक भक्तांनी प्रसादा व भव्य रक्तदान शिबिराचा लाभ घेतला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*