समाज संघटनाचे नेतृत्व गुण असलेले, सर्वांना सोबत घेऊन चालणारं कणखर व्यक्तिमत्व ,अत्यंत शांत संयमी व निगर्विष्ठ व्यक्तिमत्व श्री दिलीप भाऊ राघो बडगुजर यांची नुकतीच नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांचेवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व बडगुजर समाजाला संघटित करून त्यांचा सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे तरुण तडफदार नेतृत्व श्री दिलीप भाऊ बडगुजर सर्वदूर परिचित आहेत. केवळ बडगुजर समाजच नव्हे तर इतर समाजातही त्यांची लोकप्रियता अमाप आहे म्हणूनच त्यांची नंदुरबार महानगरपालिकेच्या नगरसेवक पदी सन्माननीय निवड करण्यात आली होती. त्यांनी नगरसेवक पदाला न्याय देऊन अनेक विकासाची कामे केली आहेत. यापुर्वी ही श्री. दिलीप भाऊंनी २००२ ते २०१८ याकाळात लगातार १६ वर्षे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. आता परत त्यांच्या नेतृत्वाखाली समाज मंडळातील सर्व नूतन पदाधिकारी समाजोध्दाराचे कार्य करतील यात तिळमात्र शंका नाही.

नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाची नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे :
अध्यक्ष – दिलीप राघो बडगुजर
उपाध्यक्ष – प्रकाश नागो बडगुजर
सचिव – अश्विन भालचंद्र बडगुजर
सहसचिव – भरत सुरेश कोतवाल
खजिनदार – देविदास भगवान बडगुजर
प्रसिद्धी प्रमुख – गणेश दत्तात्रय बडगुजर
सल्लागार – पंडितराव (नाना) तोताराम बडगुजर
सदस्य – विजय संतोष बडगुजर
दिनेश शामराव बडगुजर
मोहन भाईदास बडगुजर
सुरेश भिका बडगुजर
नवीन कार्यकारणीचे बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐
श्री. दिलीप भाऊ बडगुजर व नवीन सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
💐शुभेच्छुक : प्राचार्य ईश्वर बडगुजर मुकटी.

Leave a Reply