सेवानिवृत्त सोहळा
पाचोरा, कळमसरा. ह.मु.कल्याण येथील जेष्ठ समाज बांधव श्री. निवृत्ती तापीराम बडगुजर हे स्व. तुळसाबाई व स्व. तापीराम नथ्थू बडगुजर यांचे चार मुली व तीन मुले त्यापैकी कनिष्ठ चि.श्री. निवृत्ती तापीराम बडगुजर उर्फ (N T.Badgujar) ह्यांचे प्राथमिक शिक्षण आपल्या मुळगांवी व पुढील शिक्षण एस् एस् सी, आय टी आय, एन सी टी व्ही टी शहरी भागात झाले असून कढोली येथील स्व.धर्मा गणपत बडगुजर यांची मुलगी सौ. आशाबाई श्री. निवृत्ती बडगुजर यांच्याशी लग्न झाले त्यांना दोन मुले, B.E – Mechanical, MBA- IT. उच्च विभूषित असून त्यांचेही लग्न झालेले असून दोन नातवंडे आहेत.
सुरुवातीला मुंबई डिव्हीजन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे असिस्टंट लोकोपायलट म्हणून सिलेक्शन झाले नंतर उपनगरीय लोकल(ड्रायव्हर) पायलट म्हणून सेवा केली त्यानंतर (मध्य रेल्वे) मेल एक्सप्रेस सिनियर लोकोपायलट म्हणून प्रदिर्घ सेवा करीत असताना दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेत त्यानिमित्ताने त्यांचा सेवानिवृत्त सोहळा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या व समाज बांधवांच्या उपस्थित कल्याण पूर्व येथील कर्पे हाॅल (karpe holl) येथे संपन्न झाला सेवानिवृत्ती नंतरचे आपले पुढील आयुष्यातील सारी स्वप्न साकार व्हावी, आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, निरोगी, निरामय, आनंददायी जावो, आणि या पुढील काळात आपल्या हातून सामाजिक कार्य घडत राहो! पुनश्च आपणांस पुढील भावी आयुष्य निरोगी, निरामय, आनंददायी जाण्यासाठी अभिष्टचिंतन व आई चांमुडा माता आपणांस उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
बडगुजर. इन, वेब पोर्टल टीम कडून माता चामुंडा चरणी प्रार्थना!
N T.Badgujar मो. 7304374879
Leave a Reply