बोराडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. टी.टी.बडगुजर सर यांना नुकतेच शिक्षक दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रिडा महासंघ व क्षत्रिय बडगुजर शिक्षण संस्था व नवोदय युवामंच धुळे तर्फे सन्मानित करण्यात आले.
आज या लेखात जाणून घेऊया श्री. टी. टी. बडगुजर सरांविषयी. श्री. टी. टी. सरांना प्रथम कोडीद येथे मुख्याध्यापक म्हणून सेवेची कोविद येथील शाळेत मिळाली. त्यावेळी अतिशय बिकट परिस्थिती होती. आज सारखी वाहने नव्हती शाळेसाठी विद्यार्थी आणण्यासाठी पुर्ण टिम अक्षरशः सायकलवर, पायी फिरले, पालक व विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन कर्मवीर आण्णाबाबा आपल्या भागाच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडत आहेत, हे समजावुन दिले. सर्वांच्या प्रयत्नाने आज दि.न.पाडवी माध्यमिक विद्यालयाच्या वटवृक्षाचा विकास झाला आहे. आपण अष्टपैलु, अजातशत्रु, सहकारी, मैत्रीपूर्ण व्यक्तीमत्व म्हणतो ते टी.टी.बडगुजर सरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. हिंदी विषयात अतिशय प्रभावी अध्यापन करुन ज्ञानदान केले.
याशिवाय स्काऊट गाईड चळवळ, व्यंकटेश क्रिडा स्पर्धा,दहावीच्या बोर्डाच्या परिक्षा, नियामकाचे काम, शालेय व्यवस्थापन व कागदपत्रांची पद्धतशीर मांडणी, वेळापत्रक, ऐनवेळेस आलेल्या समस्या व निराकरण, शैक्षणिक सहलींचे नियोजन, समाजातील संघटन इ.क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. कर्मवीर बाबा स्काऊट गाईडचे स्टेट कमिशनर असतांना अनेक मेळावे, शिबिर, राज्यस्तरावरील मेळावे, गावात, परिसरात विविध कार्यक्रम, रॅली, वृक्षारोपण होत असत त्यात सरांचा महत्त्वाचा सहभाग असायचा. १९९० पासुन व्यंकटेश क्रिडा स्पर्धेतील सामन्यांच्या लाॅट्सचे कागदावर अतिशय सुंदर अक्षरात नियोजन, मैदानावर दिवसभर समालोचन, बक्षिस वितरण समारंभातील नियोजनात महत्त्वाची भूमिका होती. अतिशय मनापासून त्यात स्वतःला झोकून देत असत.
अशा या दिग्गज व लढवय्या व्यक्तीमत्वास काल धुळे येथे दि. ५ सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिना निमित धुळे जिल्हा क्रिडा महासंघ यांचे वतीने प्रदिर्ध सेवेत क्रिडा शिक्षक म्हणून मुलांना क्रीडा विषयी चांगले योगदान केले. त्यामुळे जिल्हा क्रीडा संघाने प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. आसारामजी जाधव यांच्या हस्ते श्री टी.टी बडगुजर सर यांना सन्मानित करण्यात आले तसेच क्षत्रिय बडगुजर शिक्षण संस्था व नवोदय युवामंच धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त श्री. टी. टी. बडगुजर सर यांना श्री. आनंदा भाऊ धोडू सुर्यवंशी अध्यक्ष धुळे बोर्डिग यांच्या हस्ते व प्रमुख मानवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
श्री. टी. टी. बडगुजर सर हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असून ते उत्कृष्ट संघटक व बडगुजर. इनचे मार्गदर्शक आहेत. सरांना शिक्षण दिनाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस बडगुजर.इन टिमकडून हार्दिक शुभेच्छा.
💐🙏 Congratulations sir ji.
* हरहुन्नरी, विद़यादानाचे महान कार्य ग़ामिण भागात महजाघडविसमाथउंचावण्या साठी विविध उपक्रम राबविणारे समाज शिक्षक श्री ताराचंदजी बडगुजर, सर,
यांचा शिक्षक दिनी झालेल्या गौरवा बध्दल
हार्दिक अभिनंदन !
Congratulations,
Sir
बोराडी या अति दुर्गम आदिवासी भागात अनेक वर्ष मनोभावे
विद़यादानाचे महान कार्य करून हजारो घडनिरनिराळे नाविन्य
पूर्वक उपक़म राबवून ते यशस्वी रित्या यशस्वी करणारे
* समाज कार्यात स्वत:ला झोकून देणारे ,
श्री ताराचंदजी बडगुजर सर,
यांचा शिक्षक दिनी झालेल्या गौरव सन्माना बध्दल
हार्दिक अभिनंदन !.