||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
शहादानगरीत निंबाजी ट्रेडर्स चे दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी गुरुवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन हे BAPS स्वामिनारायण मंदिर, धुळे येथील संत पु. श्री योगीस्नेही स्वामीजी, पु. श्री अखंडमुनी स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अभिजीतदादा पाटील मा. जि. प. सभापती नंदुरबार हे होते. प्रमुख अतिथी हे श्री. रवींद्र चिंधा बडगुजर, एम.डी. श्री. नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेड (सातपुडा तापी परिसर शहादा) व श्री. दिलीप राघो बडगुजर, उपाध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर महासमिती व माजी नगरसेवक नंदुरबार हेही उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी नातेवाईक, समाज बांधव, भगिनी व मित्र परिवार व फिल्डकिंग कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी, डिस्ट्रीब्यूटर हे उपस्थित होते. चि. गौरव सुनील बडगुजर हे ॲड. श्री. सुनिल निंबा बडगुजर यांचे चिरंजीव आहेत. लहान वयात उद्योजक म्हणून नावारूपाने पुढे येत आहेत. गौरव ट्रेडर्स, रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी, यावल रोड चोपडा येथे जळगाव व नंदुरबार जिल्ह्याचे फिल्डकिंग कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर आहेत. आता अधिकृत विक्रेता शहादा येथे फिल्डकिंग कंपनीचे निंबाजी ट्रेडर्स या नावाने डीलर ऑफिस चे ओपनिंग केले. येथे शेतकऱ्यांसाठी रोटावेटर यंत्र, शेती अवजारे व स्पेअर पार्टस् हे योग्य व माफक दरात मिळतील. या नवीन व्यवसायाचा भव्य शुभारंभ निंबाची ट्रेडर्स, साईबाबा मंदिर जवळ, न्यू प्रकाशा रोड शहादा येथे आहे. त्याबद्दल सौ. विद्या बडगुजर व सौ रोहिणी रवींद्र बडगुजर अधिकृत डिलर शहादा व चि. गौरव सुनील बडगुजर डिस्ट्रीब्यूटर गौरव ट्रेडर्स चोपडा यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations and wishing you every success in the business. Stay blessed always.
. हार्दिक अभिनंदन !
* यशस्वी भव!