बडगुजर विद्या प्रसारक मंडळ, जळगांव ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न – श्री. सुरेश शिवराम महाले, भुसावळ

बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी मंडळाच्या वस्तिगृहावर मंडळाचे अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस सभेसाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई चे अध्यक्ष श्री. बापूराव किसनराव बडगुजर, अ.भा. बडगुजर समाज महा समितीचे मा. उपाध्यक्ष श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर यांना व्यासपीठावर सन्मानाने पाचारण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेस सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविक पर भाषणात मंडळाचे अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांनी गेल्या तीन वर्षाचा मंडळाचा लेखाजोखा सभेसमोर मांडला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, कार्यकारिणीने वस्तीगृहाचे नूतनीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले होते ते पूर्ण करण्यासाठी कार्यकारणी सदस्यांकडून देणगी स्वीकारून नूतनीकरणाच्या कामास सुरुवात केली. या कामासाठी सोशल मीडियाद्वारे बडगुजर समाजातील अनेक दानशूर व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला, समाज बंधूंनीही कार्यकारणीच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळास भरभरून देणगी दिली त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक येथील प्रभाकर दिगंबर बडगुजर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. बापू किसन बडगुजर कुर्हे पानाचे येथील ज्ञानेश्वर बडगुजर श्री. नंदलाल रामदास पवार संस्थेचे माजी अध्यक्ष श्री भिला गिरधर बडगुजर तसेच प्रकाश नागो बडगुजर ,श्री. रविंद्र दत्तात्रय बडगुजर श्री. धनंजय बडगुजर कुसुंबा येथील राजेंद्र भालचंद्र बडगुजर, साप्ताहिक समाजदुतचे संपादक श्री ईश्वर हरचंद बडगुजर, मुंबई मंडळाचे मा. अध्यक्ष श्रीकृष्ण भिका बड. अ. भा. बडगुजर समाज महा. स. मा. अध्यक्ष श्री. उमेश शेठ करोडपती धुळे मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र नंदवाळकर, फागणे येथील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते श्री. केशव शेठ नंदवाळकर, पुणे येथील उद्योगपती श्री. रवींद्र त्रंबक बडगुजर, जळगाव येथील डी. एम. बडगुजर, ललित मधुकर बडगुजर आणि वामन बडगुजर, बापू धोंडू बडगुजर आदींनी देणगी दिली या सर्व दानशूर समाज बांधवांचा मंडळाच्या वतीने शाल ,पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य श्री लीलाधर बडगुजर, उपाध्यक्ष श्री सुरेश शेठ महाले, सचिव श्री. गोविंद शेठ बडगुजर, सहसचिव सौ. ज्योतीताई परशुराम बडगुजर श्री. विकास पुंडलिक बडगुजर, श्री. प्रकाश धुडकू बडगुजर, श्री. राजेंद्र महादेव पवार, श्री. राजेंद्र दत्तात्रय पवार. श्री. दत्तात्रय निंबा बडगुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारा्थी श्री. बापू किसन बडगुजर, श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर, श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर ,श्री. ईश्वर हरचंद बडगुजर, श्री. राजेंद्र नंदवाळकर आदींनी समाज प्रबोधन पर व मंडळाच्या अभिनंदन पर संबोधन केले. याप्रसंगी वसतिगृहाचे बदललेलं रूप बघून सर्व मान्यवरांनी कार्यकारणीचे कौतुक केले व भविष्यातही चांगल्या कामाकरता आर्थिक मदत देण्याचेही आश्वासन मंडळास दिले.

याप्रसंगी मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त झालेले श्री. शरद भटू बडगुजर, श्री. अंबादास तुकाराम बडगुजर यांचा, तसेच जळगांव येथील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी श्री. दिनेश बडगुजर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली याबद्दलही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्वसाधारण सभेच्या अजेंडाच्या विषयाप्रमाणे मंडळाने घटनादुरुस्तीचा ठराव ठेवून कार्यकारणीतील सदस्य संख्या तेरा वरून 23 वर करण्याचा ठराव सर्व संमतीने पारित केला. तसेच 2022 ते 2025 या कालावधी करता नवीन कार्यकारणी सदस्यांची निवड ही या ठिकाणी करण्यात आली. नवीन निवड ही सर्वसमावेशक पद्धतीने म्हणजेच तालुका स्तरावर सदस्य घेऊन पूर्ण जिल्ह्याला कार्यकारणीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. सभेस बोदवड येथील विजय शिवराम बडगुजर, कुऱ्हे येथील रामलाल गोविंदा बडगुजर, भुसावळ चे निलेश शरद बडगुजर, श्री. संजय शिवदास बडगुजर असे समाजातील बरेच मान्यवरांची उपस्थिती लाभली. या सभेचे सर्व सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य श्री. प्रकाश धुडकू बडगुजर यांनी केले. सभेचे शेवटी मंडळाचे अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांनी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे तसेच सभेस उपस्थित असलेल्या मंडळाच्या सदस्यांचे आभार मानले व सभा समाप्तीची घोषणा केली.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*