सौ. सोनाली संदीप पाटील यांना रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात – सौ. सारिका पाटील, अमरावती

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

अमरावती, अंबिका नगर येथील श्री. संदीप विजयराव पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. सोनाली संदीप पाटील यांनी ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने रांगोळी स्पर्धा ही आयोजित केलेली होती, व त्यात सौ. सोनाली पाटील यांचा प्रथम क्रमांक मिळाला व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्री. संदीप पाटील यांचे साईअंश मोबाइल शॉप हे प्रशांत नगर, अमरावती येथे आहे. श्री. राजेंद्र शंकरराव बडगुजर , बोदवड यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण B.E.M.Tech( Electrical) झाले आहे. त्या Assistant Professor in Government College of Engineering Amravati येथे कार्यरत आहेत. त्यांचे सर्व शिक्षण हे मामांकडे व आजोबा श्री,.सुभाषराव बळीरामजी दातेराव बडनेरा येथे केले. Engineering आणि M.tech हे शिक्षण लग्नानंतर पुर्ण केले. त्यांचे सासरची मंडळी खुप supportive आहे त्यांनी त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यास खुप support केला आहे. रांगोळी हा त्यांचा छंद आहे. त्या रांगोळी कलाकृती मुळे त्यांना आतापर्यंत बऱ्याच स्पर्धेमध्ये बक्षीसही मिळाले आहे. त्यांचा अजूनही एकत्र कुटुंब आहे ते आवर्जून सांगतात.
सौ. सोनाली संदीप पाटील यांना रांगोळी स्पर्धेत पारितोषिक देऊन गौरविण्यात त्याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

सौ. सोनाली संदीप पाटील – 96233 91273


.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*