इंदूर आय आय टी ते एम एस कॅलिफोर्निया कु. गुंजन चा प्रेरणादायी प्रवास – प्रा. मिलिंद बडगुजर सर, जळगांव

जळगाव येथील आदर्श क्लासचे संचालक श्री गणेश नारायण बडगुजर आणि सौ.वंदना बडगुजर यांची जेष्ठ कन्या कु. गुंजन ही नुकतीच सॅनडियेगो येथे कार्यरत असून आयआयटी( IIT ) ते एम एस ( M S )हा तिचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा असा आहे. वडील श्री गणेश पाटील हे जुन्या काळातील इंजिनिअर असून सुद्धा नोकरी करून चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांनी आदर्श क्लासच्या माध्यमातून एक नवीन पाय वाट निवडली आणि या छोट्याशा रोपट्याचे रुपांतर मोठ्या वटवृक्षात झाले. आज जवळपास एक हजार पर्यंत विद्यार्थी संख्या या क्लासमध्ये असून ते स्वत: आठ ते दहा शिक्षकांचे पोशिंदे बनले आहेत. आदर्श क्लासचे वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षी गणित या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण ( मार्क्स ) मिळवणारे कमीत कमी पाच ते सहा विद्यार्थी बोर्डाच्या यादीत झळकत असतात.

वडिलांनी दिला ज्ञारुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता-बंधु-माता तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्हीसूर्य अम्हां दिला कवडसा!……..

हाच वडिलांचा वारसा पुढे चालवत कु. गुंजनने जळगाव येथील रुस्तमजी स्कूल येथून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईमधील पेस इन्स्टिट्यूटमधून बारावीचे शिक्षण पूर्ण करत थेट इंदोर येथील आयआयटीमध्ये सन 2013 ला प्रवेश मिळवला.

गुंजन नेहमी म्हणते ” मेहनत आणि महत्त्वाकांक्षा या दोन पुरक बाबी आहेत. महत्वकांशा शिवाय माणूस मेहनत करीत नाही आणि मेहनतीशिवाय महत्त्वकांक्षा पूर्ण होत नाही.” तिच्या या जिद्दीमुळे कदाचित बडगुजर समाजातील मुलींमधून प्रथम आयआयटीयन होण्याचा मान तिने मिळवला आहे. असे म्हणण्यास हरकत नाही. “माणसाने कष्ट इतक्या शांततेत करावे की यशाने धिंगाणा घातलाच पाहिजे” याचा प्रत्यय गुंजन च्या इंदोर येथील आयआयटी मधील वार्षिक अंकांतील शिक्षकांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. काही प्रतिभावंत मुले मुली हे केवळ विद्यार्थी न राहता चांगल्या शिक्षकांचे गुरु सुद्धा बनत असतात. गुरु वोके गुरु म्हणूनच की काय ज्या ज्या वेळेस इंदूर येथील आयआयटीमध्ये एखादे गणित कुणालाच जमत नसेल त्या त्या वेळेस गुंजनला बोलविणे होत असे. कारण….
Achievers never expose themselves,but their achievements expose them…..

म्हणूनच इंदोर येथील आयआयटीमध्ये मुलींमधून प्रथम क्रमांकने उत्तीर्ण होण्याचा मान तिला प्राप्त झाला. परंतु केवळ एका यशाने हुरडून जाईल ती गुंजन कसली ? आजच्या काळातील लाखो-करोडो मुलांचे स्वप्न असलेले आयआयटी पूर्ण करून सुद्धा तिची ज्ञानलालसा अपूर्णच होती…. …आणि म्हणूनच लाखो रुपयांचे पॅकेज मिळत असताना सुद्धा तीने एम एस करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कारण….

कई जीत बाकी है कई हार बाकी है.!
अभी तो जिंदगी का सार बाकी है..!
यहा से चले है नयी मंजिल के लिए.,.!
ये एक पन्ना था अभी तो किताब बाकी है……..!

एम एस करण्याचा तीचा हा निर्णय एवढा सोपा नव्हता, “कारण जेवढा मोठा निर्णय असतो तेवढ्या मोठ्या समस्या असतात.” मात्र असे म्हणतात किती जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला साथ देत असतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या मात्र, व्हिसा मिळवण्यासाठी करोडो रुपयांचा गॅरेंटर हवा होता. याप्रसंगी सोलापूर येथील तिच्या वडिलांचे काका मॅक्स्कोस( Maxkos ) फार्मासिटिकल कंपनीचे मालक श्री काशिनाथ धोंडू पाटील( K D Patil ) हे देवदूताप्रमाणे धावून आले आणि त्यांनी रिकामा चेक तर दिला तसेच आपल्याकडील सर्व लिक्विड असेट यांची यादी बॉण्ड पेपर वर करून दिली. असेच मोलाचे सहकार्य सुरत येथील काका श्री मुरलीधर नारायण शेठ ( संजय शेट ) बडगुजर यांचे लाभले. तद्वतच श्री रमेश सांडू पवार यांनी सुद्धा सर्वतोपरी सहकार्य केले.

“एक गोष्ट मात्र नक्की की,गुणवत्तेचे अस्तित्व कधीच लपून राहत नाही.” आणि म्हणूनच गुंजनला न्यूसी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अँड सॅनडिएगो येथे एम एस करत असतानाच दुसऱ्याच महिन्यामध्ये तीला टिचींग असिस्टंट म्हणून जॉब मिळाला. अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना गणित शिकवण्याची जबाबदारी तिला मिळाली. या माध्यमातून डिजिटल कम्युनिकेशन या क्षेत्रात तिला नवीन संशोधन करण्याची संधी प्राप्त झाली. सम्पूर्ण एमएस तिने आपल्या पगाराच्या माध्यमातून पूर्ण केले. 2019 मध्ये एम एस पूर्ण झाल्यानंतर केलझाल ( Kelzal) या कंपनीमध्ये तिला स्टार्टअप म्हणून मशीन आणि डाटा इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. गेल्या वर्षापासून ती पिंटरेस्ट (Pinterest ) या कंपनीमध्ये जाहिराती शी संबंधित मशीन आणि डाटा इंजिनियर म्हणून कार्यरत असून मोठ्या मॉलमध्ये बिल पेमेंट करण्यासाठी रांगेत उभे न राहता तुम्ही ज्या वस्तू तुमच्या ट्रॉली मध्ये टाकाल त्याचे बिल तुम्हाला तुमच्या स्मार्ट कार्ड मार्फत भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या यंत्रणेवर ती सध्या काम करत आहे.

आजच्या मुला-मुलींना काय संदेश देणार हे विचारले असता ती म्हणते की *” आत्मविश्वासाने सर्वकाही कमावता येते. अपयशाने मात्र कधीच खचून जाऊ नका चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात… अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात… पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात… *आयुष्य अवघड आहे पण… अशक्य नाही….. आणि म्हणून तुमच्या अभ्यासाचा सराव एवढा करा की, तुम्ही त्यात परिपूर्ण परफेक्ट झाले पाहिजे. जीवनात नवीन वाट धरण्याची जिद्द ठेवा. यश नक्की तुमचेच आहे..”

जिंदगी का नया दौर बाकी है।
शुरू किया वह हर सफर बाकी है।
अभी तो नापी है मुट्ठी सी जमीन।
आगे तो सारा आसमान बाकी है।……..✈

आपल्या मोठ्या बहिणीचा हाच मंत्र लहान बहीण कु. चारूल हीने लक्षात ठेवून गायन या क्षेत्रामध्ये तीने अनेक मानसन्मान व बक्षिसे प्राप्त केलेली आहेत..

बडगुजर समाजातील विशेषत: मुलींना प्रेरक ठरणाऱ्या कु. गुंजनच्या या प्रवासाला आणि भावी वाटचालीस अखिल भारतीय बडगुजर महासमितीच्या वतीने बडगुजर प्राउड ग्रुप च्या वतीने आणि बडगुजर डॉट इनच्या वतीने अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐
शुभम भवतु.. ,,! यशस्वी भव ….!

शब्दांकन प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव ( 9421184495 )

17 Comments

  1. असेच यशाची उंच उंच शिखर घाटत जा आपले व आपल्या आई वडिलांचे नाव मोठे कर हेच मनापासून शुभेच्छा

  2. इंजि. सुकुमारी गुंजन आपले, मातापिता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    पारूल, गुंजन या भगिनींचा आम्हाला अभिमान आहे! प्रा. मिलिंद सरांनी खुप छान लेख लिहिला आहे. /डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

  3. गुंजन चे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  4. गुंजन ही समाजातील शिक्षण घेत असलेल्या सर्वांसमोर आदर्श आहे. मी जवळून पाहिलंय…कायम हसमुख, शांत,तल्लख विद्युलता जशी, गुंजन अभ्यासात तर तिची धाकटी बहीण गाण्यात उंचीवर गुणात्मक स्थान मिळवून आहे.या दोघींची आई म्हणजे साधी गृहिणी,सतत व्यस्त,कुठलीही मागणी नाही पण गुणग्राहक, वडील श्री गणेश पाटील सांगणे न लगे.. अत्यंत हुशार,धेयनिष्ट, आणि कष्टाळू व्यक्तित्व, कुठेही बडेजाव नाही, रिकामी बडबड नाही…सतत कार्य व्यस्त…संपूर्ण कुटुंबाला रह्युदया पासून सल्यूट आणि उत्तुंग यशासाठी शुभेच्छा.

  5. Heartiest congratulations Gunjan and her parents for achieving the glorious and bright success.
    All the best for your future development.

Leave a Reply

Your email address will not be published.


*