भुषण चव्हाण यांचे शिक्षण पदवीधर(B Ed) परिक्षेत घवघवीत यशः डॉ.नितीन बडगुजर, जळगाव

|| अभिनंदनीय बातमी ||
.
जळगावः येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रामदास बंडू बडगुजर यांचा नातू व श्री.प्रताप सिताराम चव्हाण (बडगुजर) वाहन चालक,राज्य परिवहन, यांचा मुलगा व आमचा भाचा भूषण प्रताप चव्हाण (MCA),सेंट जोसेफ इंग्लीश मेडियम स्कूल,जळगाव येथिल शिक्षक पदावर कार्यरत असून तो संगीत विशारद,संगीत विशारद तबला तथा गायकही आहे.
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या BEd [शिक्षण पदवीधर] परिक्षेत १७३५/२००० म्हणजे [९.७६सीजीपीए (८६.७५%)] गुण संपादत करत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.
भूषण चव्हाण हा “स्वर साधना संगीत विद्यालय अंतर्गत “स्वर साधना क्लासेस” चे संचालक प्रा.संजय बडगुजर यांचा शिष्य व भाचा असून,८०व्या वर्षी बासरीचे क्लासेस चालविणारे आजोबा श्री.रामदास बंडू बडगुजर यांचा नातू आहे.तो आजोबा व मामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत संगीत व शैक्षणिक क्षेत्रांत वाटचाल करत आहे व चव्हाण परीवाराचे नांव उज्ज्वल करत आहे.
भूषण चव्हाणने प्राप्त केलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल जळगाव बडगुजर समाजातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती,बडगुजर वेब पोर्टल टीम,बडगुजर्स प्रॉऊड मंच तथा समस्त बडगुजर समाज बंधूभगिनी कडून त्रीवार अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.


1 Comment

  1. Congratulations Bhushan. Wish you a very bright career in your future life. Stay blessed always. Congratulations to Pratap, Sunita, Ramdas Seth and Sanjay also.

Leave a Reply

Your email address will not be published.


*