चि. योगेश प्रकाश बडगुजर यांनी युरोप खंडातील सर्वात उंच शिखर एलब्रूस फार करून भारताचा तिरंगा फडकविला – अमोल मुकेश बडगुजर, धरणगांव

अर्थे येथील श्री. प्रकाश उत्तम बडगुजर हल्ली मुक्काम जळगांव व सौ. रत्‍नाबाई प्रकाश बडगुजर यांचे चिरंजीव योगेश प्रकाश बडगुजर याने बडगुजर समाजात नावलौकिक मिळविले व बडगुजर समाजाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला व बडगुजर समाजाचे नांव ही उंच शिखरावर पोहोचवले. चि. योगेश प्रकाश बडगुजर यांनी अशी अतुलनीय कामगिरी केली, आपण आपल्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करीत असताना आपले एक बडगुजर बांधव चि. योगेश बडगुजर गिर्यारोहकाने दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी युरोप खंडातील सर्वात मोठे उंच शिखर एलब्रूस हे पार करून त्याने आपल्या देशाचा तिरंगा ध्वज हा मोठ्या डौलाने व मानाने फडकवला…
शिखरची उंची 5642 मीटर म्हणजेच 18510 फूट उंच आहे. त्यांनी खान्देची मान तर उंचावली पण खान्देश सह संपूर्ण महाराष्ट्र, भारताचे नांव युरोप खंडात पोहवचले आहे. योगेश बडगुजर यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे
त्यांनी असे बरेच शिखर पार केले आहेत. प्रथम त्यांनी सिक्कीम येथील रेनॉक 65000 फूट शिखर सर केले होते. चि. योगेश प्रकाश बडगुजर यांनी दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया देशातील माऊंट किली मांजारो या पर्वतावर गिर्यारोहण करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर सर करणारा खान्देशातीलएकमेव गिर्यारोहक आहे १९३४१ फूट ( ५८९५) मीटर उंच शिखरावर पोहोचल्यावर त्याने आपल्या देशाचा तिरंगा, आपल्या गुरूंचा कविता संग्रह बंदमुक्त आणि त्याला या मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या महाजन ऑप्टिकलचे बॅनर झळकावून आपला आनंद साजरा केला होता.युरोप खंडातील सर्वात उंच शिखर सर केल्या बदल बडगुजर समाज पंच मंडळ धरणगांव, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
चि. योगेश प्रकाश बडगुजर – 70669 85521

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*