श्री. दिनेश रमेश बडगुजर यांचे ‘इंडिया आप तक ‘या न्युज चॅनल तर्फे “टॉर्च बेअरर” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले – चि. रोहित बडगुजर,धरणगांव

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव सर्कल अध्यक्ष कॉ.श्री. दिनेश रमेश बडगुजर यांचे ‘इंडिया आप तक ‘या पाच राज्यांच्या कार्यक्षेत्र असलेल्या न्युज चॅनल तर्फे कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल व नोंद घेऊन “टॉर्च बेअरर” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार सोहळा हॉटेल प्रेसिडेंट पार्क जळगाव येथे संपन्न झाला, जळगाव येथील महापालिका माजी महापौर माननीय श्री. नितीन लढ्ढा यांच्या हस्ते आणि विद्यमान महापौर माननीय सौ.जयश्री सुनिल महाजन ,तसेच प्रख्यात उद्योजक श्री. प्रेम कोगटा जी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
कॉ.दिनेश बडगुजर यांच्या परिवारातील सर्व सदस्य कोरोना काळात बाधित असतांनाच अत्यंत धीरोदात्तपणे प्रत्येक गोष्टीला सामोरं जावून आपली महावितरण कंपनीच्या माध्यमातून सामान्य जनता, ग्राहक ,सेवा तक्रार निवारण आणि संघटनात्मक कामात जीव ओवाळून कार्यरत राहिले.कोविड काळात जळगाव जिल्हाभरातून व जिल्ह्यात उपचारासाठी दाखल होणाऱ्या वीज कर्मचारी संघटनेचे सभासद पदाधिकारी यांना परिमंडळ सचिव, जळगाव विभागीय सचिव, विभागीय अध्यक्ष यांचे सहकार्य मार्गदर्शन घेऊन प्रतिकूल परिस्थितीत दवाखाना,बेड उपलब्ध करून देणे.डॉक्टर व रुग्णांचे आप्तेष्टांना योग्य सल्ला व धीर देणं,संघटनेच्या वतीने पतसंस्थांच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत त्वरित मार्ग काढण्यासाठी सहकार्य केले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या अति गंभीर रूग्णांना रक्ताची गरज आहे अशा गरजूंना जात पात धर्म पंथ लिंग भेद न करता अत्यंत तत्परतेने रक्त दात्यांचा शोध घेऊन, त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क करून त्यांना रक्त दान करण्याची आवश्यकता का आहे हे महत्व पटवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन अत्यंत मोलाचे कार्य केले आहे.
तद्वतच संघटनेचे हितासाठी सुध्दा प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून सक्रिय सहभाग घेतला आणि सर्वांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्या बद्दल महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केंद्रीय,झोनल, सर्कल, विभागीय, उपविभागीय पदाधिकारी सभासद बंधु भगिनी
व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. दिनेश बडगुजर – 97652 48575

1 Comment

  1. कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
    हार्दिक अभिनंदन 👏👏💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*