2022 सकाळ IDOLS महाराष्ट्र AWARDS IN SONS OF THE SOIL श्री. धिरज वासुदेव बडगुजर
सामान्य कुटुंबातील जन्म अन् धुळेसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेतले असले तरी ध्येयाने पछाडलेल्या श्री,.धिरज वासुदेव बडगुजर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिल्व्हर फॉइल उत्पादनाच्या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी युवा उद्योजक म्हणून सुवर्ण यश मिळविलेले आहे. त्यांच्या नेतृत्वात स्टार इंडस्ट्रीज कार्यरत असून , देशभरातील विविध शहरांमध्ये त्यांचे उत्पादन पोचलेले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी उद्योगाची उलाढाल सुमारे बारा कोटींपर्यंत पोचविली आहे . स्वतःला झोकून देताना व्यवसाय वृद्धी करतानाचे त्यांचे प्रयत्न व परिश्रम युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.
मुळचे धुळे येथील धिरज बडगुजर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जयहिंद हायस्कूल येथून झाले . त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जेआरसीटी हायस्कूल येथून विज्ञान शाखेतून घेतले . त्यानंतर धुळ्यातीलच गंगामाई पॉलिटेक्निक ॲन्ड इंजिनिअरिंग कॉलेज येथून ई ॲन्ड टीसी या शाखेतून अभियांत्रिकी शिक्षण २०१३ च्या सुमारास पूर्ण केले. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनीही साधारणतः चार वर्षे पुण्यातील कोनिका मिनोल्टा या कंपनीत सर्व्हिस इंजिनिअर या पदावर नोकरी केली. यशस्वी व्यावसायिक, उद्योजक होण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासून पाहिले होते. चांगली नोकरी सुरू असतानाही जोखीम पत्करून आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आरे डेअरी येथील शासकीय नोकरीतून निवृत्त झालेले वडील वासुदेव लोटन बडगुजर यांचे मार्गदर्शन घेताना व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली .
शून्य भांडवलापासून सुरवात , कोट्यवधींच्या उलाढालीचा प्रवास
वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन होत परंतु व्यवसायाला श्री . बडगुजर यांनी शून्य भांडवलापासून सुरवात केली , ही देखील कौतुकास्पद बाब आहे. २०१६ मध्ये वापी येथे भेट देताना तेथे व्यवसायाचे घडे त्यांनी गिरविले . याच काळात ओम साईराम एंटरप्राईझेसच्या माध्यमातून सिडकोतील एका दहा बाय दहाच्या खोलीत व्यवसायाला सुरवात केली . प्रारंभी पेपर ग्लास आणि बीओपीपी टेप्सची विक्री ते करत होते . कालांतराने पॅकेजिंग मटेरियलमध्येही पदार्पण केले . अथक मेहनत , जिद्द , चिकाटीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय , उद्योगातील उलाढाल कोटी रुपयांपर्यंत नेली आहे . वयाच्या चाळिशी पर्यंत उलाढाल पन्नास कोटीपर्यंत पोचविण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत . यासाठी ते आधुनिक कौशल्य आत्मसात करण्यावर भर देत असून , त्याकरिता दिल्ली , मुंबईमध्ये भरणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शनाला भेटी देत असतात . येत्या तीन – चार महिन्यांत अद्ययावत असे फॉइल कंटेनर उत्पादनाचे मशिन उपलब्ध करून देताना उत्पादनाचा विस्तार करण्याचे ध्येय त्यांनी ठेवलेले . आहे .व्यवसायालाच छंद मानून , त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेले श्री . बडगुजर आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्ती आहेत . व्यवसाय करताना मराठी माणूस म्हणून काही वेळा त्रास आला . पण आपले ध्येय स्पष्ट असतील तर यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही , ही बाब तरुणाईने लक्षात घ्यावे , असे श्री . बडगुजर आवर्जून सांगतात . आजवरच्या जीवनकार्यात आई आशा बडगुजर यांचेही वेळोवेळी प्रोत्साहन लाभल्याचे ते सांगतात .
कोरोनाकाळातही उत्पादन ठेवले सुरू
सिल्व्हर फॉइलला देशभरातील हॉटेल , पॅकेजिंग उद्योगांसोबत घरगुती स्तरावरही मागणी राहिलेली आहे . मात्र कोरोना महामारीच्या काळात सारेकाही ठप्प झालेले असताना , सिल्व्हर फाइल उत्पादन मात्र सुरू होते . या कालावधीत कोरोनाबाधित रुग्ण , त्यांचे नातेवाईक यांच्या पर्यंत जेवण पोचविण्यात सिल्व्हर फॉइल पेपर उपयोगाचा ठरला . आजवरच्या प्रवासात घरासारखी माणसे व कष्ट घेणाऱ्या कामगारांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे श्री . बडगुजर सांगतात .
सिल्व्हर स्टार इंडस्ट्रीची उभारणी , देशभर विस्तार
२०१ ९ मध्ये उत्पादन क्षेत्रात उत्तरताना श्री . बडगुजर यांनी सिल्व्हर स्टार इंडस्ट्रीज कंपनीला अंबड एमआयडीसी येथील भाडेतत्त्वावरील जागेत सुरवात केली . सिल्व्हर फॉइलच्या उत्पादनापासून सुरवात करताना पुढे उद्योगाचा विस्तार केला . अंबडमधील जागेसह विल्होळी येथील जागेतही उत्पादन सुरु केले . ४ जून २०१५ मध्ये कुमोदिनी यांच्याशी विवाह बंधनात ते अडकले . एमसीएस अशा उच्चशिक्षित सौ . बडगुजर यांचे व्यवसाय सांभाळण्यात विशेष सहाय्य लाभले . बडगुजर दांपत्याचे जीवन शौर्य या मुलाच्या रूपाने सुखी व समृद्ध झालेले आहे .
श्री धीरज व यांच्या परिवाराचे सर्वत्र- नाशिक, शिरपुर तसेच जळगाव-धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आप्तेष्ठ, बडगुजर समाज बंधूभगिनी, तथा उद्योग क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री. धीरज यांच्या सुवर्ण यशाकरीता समस्त बडगुजर समाज, शिंदखेडा-अमळथे, श्री चामुंडा माता युवक मंडळ, नाशिक, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर.इन वेबसाईट यांच्या तर्फे अभिनंदन..! आणि पुढील औद्योगीक वाटचाल करीता खुप खुप हर्दिक शुभेच्छा..!
एक समाज एक व्यासपीठ…
अभिनंदन धिरज
An initiative in industrialization.Rally proudful for badgujar’s. Best of luck and best wishes for bright future
Congratulations and happy prosperous life ahead. Stay blessed always.
Congratulations Munna Beta & Keep it Up Go Ahead…💐💐👌