चि.हर्षल संजोग साळुंखे याचे घवघवीत यश – श्री.पंकज करोडपती, चोपडा

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

चोपडाः येथील जेष्ठ समाज कार्यकर्ते व श्री साने गुरुजी प्रबोधिनी मंडळ, चोपडा,उपाध्यक्ष श्री.सोमनाथ डोभा बडगुजर(साळुंखे)व धुळेस्थित प्रा.सी.डी.साळुंखे सर यांचा नातू तथा श्री संजोग सोमनाथ साळुंखे यांचा मुलगा हर्षल हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत डॉ.डी.वाय्.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, अकुर्डी येथून इंस्ट्रूमेन्टेन्शन अँड कंट्रोलअभियांत्रिकी शाखेत अंतीम वर्षी (२०१८-२०२२ शैक्षणिक काळ)७७.५%टक्के तथा ओव्हरआॕल ॲग्रीगेट ७३% गुणांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला.
हर्षल हा लहानपणा पासून चुणचुणीत व हुशार असून चोपडा येथे १०वी व १२ वीत ही विशेष प्राविण्यासह यश संपादन केले.कारणे चोपडा,धुळे,जळगाव व पुणे येथिल साळुंखे परीवारात उत्साह तथा आनंदाचे वातावरण असून हर्षल(मोंटू) व मातापित्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वेब पोर्टल टीम,बडगुजर्स प्राउड मंच,अ.भा.बडगुजर समाज महासमिती,बडगुजर समाज मंडळ चोपडा,साने गुरुजी प्रबोधिनी मंडळ, चोपडा,हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालय,चोपडा तथा समस्त बडगुजर समाजातर्फे हर्षलचे कोडकौतुक व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*