||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
आज वृक्षदायी प्रतिष्ठान व श्रीक्षेत्र देहू यांच्या विद्यमानातून, भारतरत्न कै.जे. आर. डी. टाटा साहेब यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त ११८ झाडांचा वृक्षारोपणाचा संकल्प जिव्हाळा मित्रपरिवार टाटा मोटर ई ब्लॉक, पिंपरी, पुणे व द आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने
“एक झाड माझ्यासाठी
एक झाड माझ्या कुटुंबासाठी” या कल्पनेतून भंडारा डोंगराच्या पूर्वेकडील ,सदवडी गावच्या हद्दीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ह.भ. प .श्री शिवाजी मोरे महाराजह. भ. प. श्री महादेव आव्हाड महाराज शारदा अक्का मुंढे, श्री. अविनाश दत्तात्रय बडगुजर ह. मु. देहुगांव, पुणे यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व टाटा मोटर्स कर्मचारी वर्ग,माझे सहकारी मित्रपरिवार व माझा चिरंजीव अथर्व अविनाश बडगुजर याने पण सकाळपासून दोन वाजेपर्यंत खूप मोलाचे सहकार्य केले. याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार 🙏
वृक्षदाई संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत देहूगावकडील रिंग रोड, गाथा मंदिराकडील भाग,मागील महिन्यात ही त्यांच्या कडुन भंडारा डोंगरा कडील पश्चिमे च्या बाजूस ५०० वृक्ष लागवड करण्यात आले ते पण फक्त वड, पिंपळ, चिंच यासारखे देशी वृक्ष होते. हे मागील चार ते पाच वर्षापासून वृक्ष सेवा करत आहे आणि फक्त वृक्ष लागवड नाही, तर वृक्ष संवर्धन साठी ते जास्त मेहनत घेत असतात.
Leave a Reply