शेंदुर्णी हल्ली मुक्काम जळगांव येथील कै. विश्वनाथ दौलत बडगुजर यांचे सुपुत्र तसेच जळगांव ह. मु. पुणे येथील श्री. प्रमोद विश्वनाथ बडगुजर, सेवानिवृत्त Honorary Flight Lieutenant ( भारतीय वायू दलातील सर्वोच्च पदाधिकारी ) व जळगांव येथील पोलिस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी राष्ट्रपती पदक विजेते श्री. प्रदीप बडगुजर यांचे लहान बंधू श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर हे जळगांव येथील रहिवासी असून आधीपासूनच वडिलांच्या छत्रछायेत आणि प्रेरणेने पोलीस दला विषयी विशेष प्रेम व आशा बाळगून आपले बालपणीच देशसेवा करायची प्रबळ इच्छाशक्ती मनी बाळगून होते. १९९२ साली महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत ते पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून रूजू झालेत. तद्नंतर आपल्या कार्यकुशलतेने पोलीस हवालदार पद व आता सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली.
श्री. दिनेश बडगुजर यांनी १०/१२वी चे शिक्षण जळगांव येथील नूतन मराठा विद्यालय या ठिकाणाहून पुर्ण केले. तद्नंतर एम्. कॉम ( पोस्ट ग्रॅज्युएशन ) चे शिक्षण घेतले आहे.
श्री. दिनेश बडगुजर डॅशिंग पोलीस मॅन म्हणून असे त्यांची जळगांवच्या पंचक्रोशीत ओळख आहे. त्यांनी बऱ्याचदा विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता चालू ट्रेनमध्ये ट्रेन खाली येणाऱ्या माणसाचा जीव वाचवला होता. त्याबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला. अशाच आपल्या कर्तव्यदक्ष कामगिरी बद्दल त्यांना २०१० साली पोलीस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र पोलीस दलातर्फे गौरविण्यात आले होते.
नुकतेच श्री. दिनेश बडगुजर यांनी नोकरीचे ३० वर्षे पुर्ण केले. श्री. दिनेश बडगुजर यांना एक मुलगी विशाखा व मुलगा चि. हर्षल हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. अतिशय सुखी व उच्चशिक्षित असा परिवार आहे. श्री दिनेश बडगुजर हे कर्तव्यदक्ष नोकरी करत असतांना त्यांचा परिवार सौ. काकुंनी अतिशय चोखपणे व जबाबदारी पूर्ण सांभाळला. श्री. दिनेश यांना मिळालेली सौभाग्यवतीं ची साथ व सहकार्यामुळे त्यांनी वेळोवेळी तत्पर सेवा पोलीस दलाला दिलेली आहे.
त्यांना पदोन्नती मिळाल्यामुळे परिवार, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या मध्ये अभिमानाची आणि गौरवास्पद वातावरण आहे. त्यांना मिळालेली पदोन्नती ही समाजभूषणावह आहे.
अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर यांना बडगुजर. इन टिम व बडगुजर प्राऊड फाऊंडेशन चा सलाम व भावी वाटचालीस शुभेच्छा.
अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Congratulations mama,we are proud of you.once again heartiest congratulations to you mama.