कु.अनघा पाटील,चोपडा हिचे CBSE XII मध्ये नेत्रदिपक यश – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव


अभिनंदन🌹! अभिनंदन🌹🌹!! ~•~•~अभिनंदन🌹🌹🌹!!! चोपडाः बिडगांवकर ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब विठ्ठल ओंकार पाटील व नाशिकस्थित उद्योजक दादासाहेब सुभाष डिगंबरशेठ बडगुजर यांची नात आणि चोपडा येथील प्रसिध्द स्री रोग तज्ञ डॉ.पराग पाटील व डॉ.सौ.स्मीता पाटील यांची सुकन्या अनघा हिने नुकत्याच जाहिर झालेल्या बारावी सी.बी.एस्.सी.बोर्ड च्या परिक्षेत पंकज ग्लोबल पब्लीक स्कूल,चोपडा येथून ९१.६० टक्के गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ह्यावर्षिही पं.ग्लो.प.स्कूलचा[PGPS] १००%निकाल लागला असून ७५टक्क्याचे पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.असे म्हणतात की “लक्ष्मी व सरस्वती एका घरात सुखाने कधीही नांदत नाहीत” पण पाटील परीवार या म्हणीस अपवाद असल्याचे म्हणावे लागेल कारण मुळचा शेती व्यवसाय असलेल्या या परीवाराने बडगुजर समाजास १८-२० डॉक्टर्स-इंजिनीअर्स दिलेत व सदर परीवार शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय सेवेत अग्रेसर आहे,एव्हढे असूनही संपूर्ण परीवाराला गर्वाच्या गंधाने स्पर्शही केलेला नाही.
कु.अनघा ही आपले आजोबा डॉ.दिपक{साई ) डॉ.दिलीप{नाना},डॉ.पराग व डॉ.स्मीता (आई-वडील) डॉ.काकाकाकूंचा,आदर्श डोळ्यासमोर ठेवत वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त केला असून संपूर्ण परीवाराने मान्यता दिली आहे.
कु.अनघाचे दैदिप्यमान यशामुळे पाटील परीवारात आनंदी वातावरण असून कु.अनघाचे सर्वत्र कौतुक व पाटील परीवारावर अभिनंदनाचा वर्षाव आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,वेबपोर्टल टीम, बडगुजर्स प्रॉउडमंच,बडगुजर समाजमंडळ,चोपडा व समस्त बडगुजर समाजातर्फे कु.अनघा व बिडगांवकर पाटील परीवाराचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹

4 Comments

  1. Congratulations Anagha. Wish you a very best for your future career. Wish your father mother,and Bidgokar parivarShri Subhash Seth and Mangala tai hearty congratulations. Keep it up in the future carrier.

  2. Heartiest Congratulations Beta & we wish all Best for your future endeavours, keep it up 👍

    Many Congratulations to proud Parents & Bapusaheb .

Leave a Reply

Your email address will not be published.


*