मारवड ता.अमळनेर ह. मु.शिरपूर येथील श्री परमानंद सिताराम रघुवंशी सर हे सायकल रायडींग मधील आयडियल पर्सन आहेत. प्रथम पारोषोतिक हे त्यांनी स्वर्गीय लीलाताई विश्वासराव रणदिवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित सायकल स्पर्धा ऑक्टोबर २०२१ या महिन्यात मधे झालेली होती त्यात २५ दिवसांत ३००/४०० किंवा ५०० km पूर्ण करायचे होते.व त्यात श्री परमानंद सिताराम रघुवंशी यांनी सहभाग घेतला व त्यांनी ते २० दिवसात पूर्ण ही केले, अंतर हे त्यांनी १००१ की. मी. पूर्ण करून सर्वप्रथम विजेतेपद मिळविले होते व हे बक्षीस वितरण किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव नानासाहेब निशांत रधेजी यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते त्याप्रसंगी शिरपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अतुल बडगुजर, डॉक्टर विजय अग्रवाल, शिरपूर पीपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी साहेब, शिरपूर सायकलिस्ट ग्रुप मधील सर्व मित्र परिवार उपस्थित होते यांच्या साक्षीने हा सन्मान त्यांना देण्यात आला होता. व पुढील ध्येय गाठण्यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. डिसेंबर २०२१ या महिन्यात झालेल्या स्पर्धेत ६०० किलोमीटर ३१ दिवसात पूर्ण करायचे होते ते त्यांनी अवघ्या १३ दिवसात १३ राईड मधे ६६१ km पूर्ण करून ट्रॉफी प्रमाणपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी सर्वात विशेष बाब म्हणजे त्यांनी २१२ km ची राईड ११ तासात पूर्ण केली . त्यामुळे त्यांची शिरपूर सायकलिस्ट गृप मधे एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
त्यांचे सोलो राईड म्हणून २०१ किलोमीटरचा टप्पा २ वेळा पूर्ण केलाय.
पहिला टप्पा- २०१ km हे अंतर ९ तासात पूर्ण, प्रवास हा शिरपूर-कळमसरे-नरडाना-शिंदखेडा-दोंडाईचा-नंदुरबार
दुसरा टप्पा- २१२ km हे अंतर ११ तासात पूर्ण, प्रवास हा शिरपूर-कळमसरे-नरडाना-अमळनेर-पारोळा-कसोदा-परत शिरपूर
सायकलिंग करीत असतांना असंख्य लोकांशी त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क झाला, हा प्रवास त्यांनी अगदी हसत खेळत पूर्ण केला या प्रवासात कळत नकळत असंख्य माणसं जोडली गेली त्यात सायकलिंगचे फायदे अनेकांपर्यंत पोहचवू शकले, त्यात त्यांना अनेक जिवाभावाची माणसं जोडता आली, त्यांच्या मनाला मानसिक आनंदासोबत शारीरिक फायदे पण अनेक झाले. व निसर्गाचा अगदी मनमुरादपणे आनंद घेत सायकलमय जिवनाचा संदेश समाजाला कळत नकळत ते देत गेले व यापुढे देत राहतील यात शंका नाही.सायकलिंग सोबत ते योगा, स्टेचिंग, व्यायाम, रनिंग, वाकिंग हे सतत करीत असतात यामुळे शरीरातील अनेक व्याधी व अनेक त्रास पूर्णपणे नाहीसे होण्यास मदत होते. यात सर्वप्रथम त्यांच्या परिवाराचा खूप मोठा पाठिंबा मिळाला त्यात त्यांच्या आई शोभाबई सिताराम रघुवंशी, पत्नी सौ.पुनम परमानंद रघुवंशी व मुलगा-आर्यन यांनी मला त्यांना यापासून थांबवले नाही, तर सतत प्रोत्साहन देत गेले तसेच भाऊ-वेदिया-भाऊजाई-हेमलता व पूर्णचंद्र-भाऊजाई-डॉ.मेघा तसेच शिरपूर सायकालिस्ट गृप मधील सर्वांचे चाहते “किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव आदरणीय नानासाहेब निशांत रंधेजी”, शिरपूर शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर, योगगुरू, युवकांचे प्रेरणास्थान, फिटनेस मॅन डॉ.अतुलभाऊ बडगुजर, शिरपूर पीपल बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, शिरपूर सायकालिस्ट गृपमध्ये ज्यांनी अनमोल असे कायमस्वरूपी आग्रहाने मानाचे स्थान दिले असे प्रवक्ते- महेश सोनावणे सर संपूर्ण शिरपूर सायकालिस्ट ग्रुपमधील मित्रपरिवार व “विशेष म्हणजे ज्यांच्या रोजच्या पोस्ट बघून त्यांना प्रेरणा मिळाली असे आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सायकलिंग मधे ज्यांनी आतापर्यंत ५०,००० km चा प्रवास पूर्णत्वास येणार आहे असे महाविद्यालयाचे संचालक -डॉ.जे.बी.पाटील सर” अशा सर्वांच्याच सहकार्याने व प्रेरणेचे हे फलित आहे असे ते आवर्जून सांगतात व हे सर्वच मान्यवर त्यांना नियमित पणे प्रोत्साहन देत गेले त्यामुळे हा प्रवास यशस्वी पणाने पूर्ण करू शकले.
शिरपूर सायकलिस्ट ग्रुप मधील तसेच नंदुरबार रिटर्न चे बादशहा व बॉईज हॉस्टेल चे रेक्टर आदरणीय श्री परमानंद रघुवंशी सरांनी सायकलिंग रायडींग मध्ये नुकतेच १००१८ किलोमीटर चा प्रवास फक्त ३३८ दिवसात पूर्ण केले व श्री. परमानंद रघुवंशी हे शिरपूर सायकलिस्ट ग्रुप साठी आयडियल पर्सन आहेत. ग्रुपमधील अनेक सायकल रायडर्सला ते प्रोत्साहन देतात.
त्यांचे आता पर्यत एकूण १२ सेंच्युरी आणि ४३ हाफ सेंचुरी पूर्ण केले आहेत त्यांचा हा प्रवास शिरपूर पासून सुरू करून कळमसरा,अमळनेर, नरडाणा, बेटावद, दोंडाईचा, नंदुरबार, शिरपूर असा असतो त्यांचा प्रवास हा १०२ किलोमीटर, ते २४० किलोमीटर पर्यत होत असतो.
त्यांच्या १००१८ किलोमीटर प्रवास पूर्ण झाल्याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व माहिती बघू शकतात
https://www.strava.com/athletes/34080971
https://strava.app.link/u1HB2erdjrb
श्री. परमानंद सिताराम रघुवंशी सर – 98234 89388
चांगली बातमी! अभिनंदन!!