अर्थे येथील श्री. प्रकाश उत्तम बडगुजर हल्ली मुक्काम जळगांव व सौ. रत्नाबाई प्रकाश बडगुजर यांचे चिरंजीव योगेश प्रकाश बडगुजर याने बडगुजर समाजात नावलौकिक मिळविले व बडगुजर समाजाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला अशी कामगिरी चि. योगेश प्रकाश बडगुजर यांनी केली. चि. योगेश प्रकाश बडगुजर यांचे शिक्षण हे परशुराम रामचंद्र हायस्कूल धरणगाव येथे झाले. त्यांचे मामा श्री. विलास सोमा बडगुजर यांच्या कडे धरणगांव येथे पूर्ण शिक्षण केले ते सन २०१० साल चे एस. एस. सी. बॅच चे विद्यार्थी आहेत. शालेय जीवनात तसेच महाविद्यालयीन जीवनात ते एन. सी. सी. कॅडेट चे विद्यार्थी होते. अनेक शिबिरातून त्याला साहस करण्याचं वेड होतं व सैनिक होण्याची फार मोठी इच्छा आकांक्षा होती मग त्यांनी तसे प्रयत्न केले. सन २०१७ मुंबई येथे ते फायरब्रिगेड या विभागात फायरमन म्हणून नोकरी लागली तेथूनच त्यांचे जीवनक्रम मध्येही बदल झाला, ते माऊंटट्रेनिंगच प्रशिक्षण घेतलं.प्रथम त्यांनी सिक्कीम येथील रेनॉक 65000 फूट शिखर सर केले होते. चि. योगेश प्रकाश बडगुजर यांनी दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया देशातील माऊंट किली मांजारो या पर्वतावर गिर्यारोहण करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर सर करणारा खानदेशातीलएकमेव गिर्यारोहक आहे १९३४१ फूट ( ५८९५) मीटर उंच शिखरावर पोहोचल्यावर त्याने आपल्या देशाचा तिरंगा, आपल्या गुरूंचा कविता संग्रह बंदमुक्त आणि त्याला या मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या महाजन ऑप्टिकलचे बॅनर झळकावून आपला आनंद साजरा केला.
योगेश ने नुकतेच दार्जीलिंग येथे १४ मे ते १० जून असे 28 दिवसाचे बेसिक माउंटट्रेनिंगचा प्रशिक्षणही पूर्ण केले माउंटकिलीमांजरेसाठी तो २० जूनला आफ्रिकेत गेला २२ जून ला शिखर सर करायला सुरुवात केली तीन टप्प्यात त्याने २५ जून २०२२ शनिवार रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता शिखर सर करून आपली उपस्थिती अभिनव बुकात नोंद केली. हा आपल्या जीवनातला सर्वोच्च आनंद असल्याचे सांगत होता या बद्दल थोडी माहिती दिली. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला आहे या मोहीमेच्या शिक्षणासाठी तसेच या मोहिमेसाठी महाजन ऑप्टिकल्सने मानसिक व आर्थिक सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. लवकरच योगेश हे रशिया येथून युरोपातील सर्वात उंच शिखर माउंट एलबुसला १८५१० फूट म्हणजेच ५६४२ मीटर सर करण्यासाठी १५ ऑगस्ट २२ ला निघणार आहे त्यांच्या या शिखर कामगिरीसाठी त्यांना बडगुजर. इन कडुन हार्दिक शुभेच्छा.
आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर सर केल्या बदल बडगुजर समाज पंच मंडळ धरणगांव, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
चि. योगेश प्रकाश बडगुजर – 70669 85521
Congratulations! Yogesh, Keep it up.
Congratulations. Yogesh
हार्दिक अभिनंदन व पुढील दमदार वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आम्हाला आपला आभिमान वाटतो
Fine hobby.