बोरणार ता. एंरडोल जि.जळगांव येथील रहिवासी सध्या नंदुरबार पोलीस दलात गेल्या ३० वर्षापासुन कार्यरत म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांना दोन मुली एक मुलगा असे अपत्य आहेत. मोठी मुलगी हिचे लग्न झाले. तसेच दुसऱ्या क्रमांकाची मुलगी चेतना हिला डी.एड् पर्यंत शिक्षण केले. कुसुंबाचा ता. जि.धुळे येथील रहिवासी उच्च शिक्षित पुणे येथे नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेले संदिप चंद्रकांत बडगुजर यांच्याशी सन २०१५ मध्ये विवाहबद्ध करून मोठ्या थाटमाटात विवाह केला. दोघांचा संसार सुखात चालु होता. त्यांचा संसाररूपी वेलीवर दिव्यांका नावाची कळी उमलली. कुटुंबात आनंदोत्सव साजरा झाला. दिव्यांका पाच वर्षाची झाली. कोरोना
महामारीत ऐन तारुण्यात संदिपचा पुणे येथे दिनांक २७/४/२०२१ रोजी मृत्यू झाला. त्यांचा सुखी संसाराला नाट लागली. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले. चेतनाचे वडील सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांनी मुलगी चेतना, नात दिव्यांका हिचा एक वर्ष सांभाळ केला.
समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ पदाधिकान्यासह तसेच सासर व माहेर कड़ील मंडळींनी चेतनाची समजुत घालून विचार विनिमय करून चेतना व दिर हर्षल ऊर्फ किरण यांना भावी जीवनाची भूमिका पटकून सांगितली. दोघांनी एक दुसऱ्याच्या जीवनात येऊन खांद्याला खांदा लावून ससार थाटायचा निर्णय घेतला. मुलगी दिव्यांका हिचे पालन पोषण व भविष्यातील सर्व सुख, दुख सांभाळण्याची जबाबदारी घेऊन चेतनाचा स्विकार केला. चेतनाचा जीवनातील दुःख, विरह नष्ट करण्याचा प्रयत्न हर्षल ने केल्याने सर्व स्तरावरून त्यांचावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
दोघांना विवाहबद्ध करण्यासाठी समाजातील जेष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर
दिलीप नारा्यण बडगुजर, राजेंद्र नारायण बडगुजर, दिलीप गिर्धर
शिंदे, स्नेहलकुमार दिलीप शिंदे, संजय मधुकर बडगुजर, काशिनाथ
उत्तम बडगुजर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. समाज बांधवानकड्न शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवदाम्पत्यास वैवाहिक जिवनासाठी बडगुजर. इन टिमकडून हार्दिक शुभेच्छा.
Congratulations chetan and Harshal.💐💐💐
भावी आयुष्यास व पुढील वाटचालीस शुभेच्छ व हार्दिक अभिनंदन
नवीन दिशादर्शक पायंडा .हा विवाह सोहोळा नियोजन करण्यात सहभाग असणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन
नवविवाहित दांपत्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
हर्षल भाऊ तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे….
चेतनाला आणि काव्याला तू पदरात घेतलं या पेक्षा मोठं पुण्य नाही…. कारण गरिबी एक वेळ सहन होईल पण आपला जीवनसाथी आपल्या सोबत नाही, हे एका स्री ला कधीही सहन होत नाही, नवरा एकदा स्वर्ग वासी निघून गेल्यावर तो मुक्त होतो. पण त्याच्या पाठीमागे त्याची बायको,मुलगी,आई,बहिण,भाऊ, हे प्रत्येक दिवशी त्याच्या आठवणीत मारतात, त्या वेदना सहन करन खूप कठीण आहेत, असो तू जो काही निर्णय घेतला तो खूप योग्य वेळी आणि खूपच सुंदर आहे, मी तुला ओळखत नाही तुझ्या या निर्णय मुले तुला आणि चेतना ताईला भेटायला नक्की आवडेल…. आणि जर नवीन संसाराची सुरुवात करताना काही अडचण आली, किंवा मनात काही संकोच वाटेल असेल तर मला कॉल करशील, तुझ्या मोठ्या भावा प्रमाणे तुझ्या पाठीशी उभा राहील……
हर्षल आणि चेतना तुमच्या पर्यंत हा msg पोहचला असेल तर नक्की रिप्लाय दया…. आणि पुन्हा नवीन आयुष्याच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा….