कु. सायली किरण बडगुजर ची पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड दि. 8 जून ते 12 जून पांडेचरी येथे खेळणार आहे. मांडळ तालुका अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. किरण बडगुजर यांची कन्या कु. सायली किरण बडगुजर ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे ती
एस. वाय. बी. फार्मसी ला आहे. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुन्हा निवड करण्यात आली 31 वी सिनियर महिला आट्यापाट्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली सदर स्पर्धाही पांडेचरी येथे होणार आहे या आधी चार वेळा राज्य पातळीवर, तीन वेळा राष्ट्रीय पातळीवर, एक वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेपाळ येथे स्पर्धा खेळून आलेली आहे. त्या 5 जून ला खेळासाठी रवाना झाल्या तिचे कौतुक, तसेच विशेष अभिनंदन हे बालरोगतज्ञ डॉक्टर विशाल बडगुजर, ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ बडगुजर,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील व ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन यांनी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या व खेळासाठी प्रोत्साहनही केले.
Leave a Reply