चोपडाः येथिल आबासो काशिनाथ पुंजूशेठ बडगुजर,(आमचे मेहुणे)यांचा १ जून वाढदिवस निमित्तानं मनःपूर्वक शुभेच्छा.🌹
श्री.काशिनाथसर,हे गेली ३० वर्षे शालेय शिक्षण क्षेत्रात ‘झि.तो.महाजन माध्यमिक व श्री.ना.भा.पाटील कनिष्ठ महाविद्यालय,धानोरा ता.चोपडा येथे उप शिक्षक व पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहेत.संस्थेने सरांचे वाढदिवसानिमित्त आनोखी भेट दिली ती म्हणजे संस्थेच्या कुरवेल हायस्कूल कुरवेल,ता चोपडा येथे मुख्याध्यापक पदावर बढौती देत सुखद धक्का दिला.
श्री.काशिनाथ सर मूळचे बहादरपूर ता.पारोळा येथिल सर्वसाधारण परीवारातले, लहानपणापासून चुणचुणीत, हुशार व शिक्षणाची जिद्द असलेने परिस्थिती नसतांनाही वडीलांनी त्यांना शिक्षण दिलेने सर आज त्यांचे जीवनातील ध्येयपूर्तीच्या पदावर विराजमान झालेबद्दल समाधानात आहेत.
गेली ३० वर्षे शालेय शिक्षणात कार्य करतांना आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष देत मोठा मुलगा जयेश पुणेस्थित इनफोसीस कंपनीत कार्यरत आहे.जयेशने इ.१० वीत ९९.२०% गुण संपादन करुन महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक पटकावला होता तर इ.१२ वीत ८५% गुण संपादन करून उच्चशिक्षित आहे तर लहान मुलगा गितेश हा सेंट जार्ज शासकिय दंत महाविद्यालयात वैद्यकीय क्षेत्रांत नशिब अजमावत आहे,नुकतेच त्याने प्रथम वर्षी ७७ %गुण संपादन करून घवघवीत यश संपादन केले.
श्री.काशिनाथसर शांत, मनमिळाऊ,मीतभाषी म्हणून चोपडा तालुक्यात प्रसिध्द आहेत,सेवानिवृत्तीनंतर त्यांचा मूळगावी (बहादरपूर) येथे शेती व्यवसायात रममाण होणेचा मानस आहे.
मुख्याध्यापक पदावर बढती मिळालेबद्दल चोपडा येथिल करोडपती व बहादरपूर बडगुजर परिवारात आनंदाचे वातवरण असून सरांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,बडगुजर्स प्राऊड फाऊंडेंशन,बडगुजर.इन,वेब पोर्टल टीम,बडगुजर सेना व समस्त बडगुजर समाजातर्फे श्री.काशिनाथसराचे [केपीसर]हार्दिक अभिनंदन व पुढील भरीव कार्यास शुभेच्छा.
🌹🌹🌹🌹🌹
Congratulation sir 💐