||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते,
सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,
मेहनत तर सगळेच करतात,
पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात !
आजची बातमी अशाच एका हुशार, अभ्यासू व मेहनती विद्यार्थ्याची ज्याने फार कमी वयात ध्येयसिध्दी व Milestones प्राप्त केलेत त्याची.
धरणगांव येथील श्री. योगराज शंकर बडगुजर, माजी मुख्यध्यापक यांचा नातू व प्रा. डॉ. अविनाश बडगुजर, नूतन मराठा कॉलेज, जळगांव यांचा चिरंजीव प्रणव बडगुजर याची नुकतीच कॅट परीकक्षेच्या माध्यमातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (IIM) लखनऊ, उत्तर प्रदेश, येथे एमबीए (MBA) साठी निवड झाली आहे, या आधी त्याने बी टेक ( B Tech) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (NIT), रायपूर, छत्तीसगड येथून केले आहे. बी टेक नंतर त्याचे कॅम्पस सिलेक्शन केपजिमिनी या कम्पनीत झाले होते. या कंपनीत त्याने सिनिअर अनालिस्ट म्हणून दोन वर्षे काम केले. आता एमबीए साठी नोकरीचा राजीनामा देऊ केला आहे.

आता पर्यंत प्रणव याने लहान पणापासून एनटीएस, स्कॉलरशीप, ओलम्पियड, सिइटी, जेईई या परीक्षांमधे यश संपादन केले आहे. त्याच्या निवडी बद्दल त्याचे आजोबा श्री. एम. टी. शिंदे, दोंडाईचा, श्री. अशोक शंकर बडगुजर, मामा श्री. प्रशांत शिंदे, पुणे, तसेच श्री. पंकजकुमार गुलाबराव बडगुजर, श्री. राहुल बडगुजर, श्री. रोहित बडगुजर, काका, श्री. दिवाकर बडगुजर , श्री. तुषार बडगुजर व सर्व नातेवाईक, समाज बांधवांनी त्याच्या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे. प्रणवला बडगुजर.टिम कडून सुध्दा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…



Congratulation Pranav and Nice write up sir hat’s off to you
Thanks
अभिनंदन
Hearty Congratulations,Pranav for your bright future
Congratulations Pranav…