पुणे येथील श्री. सुनिल गोविंद कोतवाल यांची लेखा अधिकारी, जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी, नाशिक पदी पदोन्नती

फुफनगरी ह. मु. पुणे येथील समाजबांधव श्री. सुनिल गोविंद कोतवाल यांची दि. १८ मे रोजी महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा गट कडून प्रसारित करण्यात आलेल्या शासकीय आदेशानुसार – लेखा अधिकारी, जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी, नाशिक पदी बढती करण्यात आली.

श्री. सुनिल कोतवाल हे फुफनगरी ह. मु. नाशिक येथील गोविंद बाजीराव कोतवाल यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी बी. कॉम. एल.एल. बी. डी. पी. एम पर्यंत शिक्षण घेतले. जानेवारी 1999 साली लिपिक या पदावर सरकारी नोकरी सुरु केल्यानंतर मेहनतीने 2005 साली MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाले व महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा सेवेतिल वर्ग 2 राजपत्रित पदावर रुजू झाले. आणि येथून श्री. सुनिल सर यांचा सरकारी नोकरी प्रवास सुरू झाला. आपल्या कार्यकुशल तेने त्यांनी तद्नंतर उप कोषागार अधिकारी इंदापूर व मुळशी प्रत्येकी ४ वर्षे कार्यभार पाहिलेला आहे. सद्या ते सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था पुणे येथे सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट शासकीय पदोन्नतीचा शासकीय आदेश दि. १८ मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये श्री. सुनिल कोतवाल यांना लेखाधिकारी, जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी पदी बढती देण्यात आली.

त्यांना मिळालेल्या पदोन्नती मुळे समस्त कोतवाल परिवार फुपनगरी नातेवाईक आप्तेष्ट व पुणे बडगुजर समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात व अभिनंदनाचा वर्षांव सुरू आहे.

नाशिक येथे पदोन्नती मिळाल्याने श्री. सुनिल कोतवाल यांचा आनंद व्दिगुणित झाला कारण नाशिक येथे त्यांचे वडील, बंधू व बहीण वास्तव्यास आहेत. आता सर्व परिवार एकाच ठिकाणी वास्तव्यास राहतील याचा विशेष आनंद त्यांना झाला आहे. श्री. सुनिल कोतवाल यांना पदोन्नती साठी बडगुजर. इन टिम व बडगुजर प्राऊड फाऊंडेशन कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

13 Comments

  1. धन्यवाद आपल्या सर्वांचे🙏 आपल्या सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा माझेवर असेच राहु दया ही विनंती

    • सुनील,
      आत्ताची पदोन्नती व बढती नंतर सेवाकार्यासाठी मिळालेले ठिकाण–नासिक— पुनश्च तुम्हां सर्व कुटुंबियांना एकत्र येण्याकरिता अत्यंत लाभदायी ठरले आहे. तुझ्याबरोबरच तुम्हा सर्व कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन !!!!

  2. Shri Sunil Gonidrao Kotwal, Congratulations and all the best for your new responsibilities. This is really great news and feel proud to all Badgujar Samaj.

  3. सुनील,
    आत्ताची बढती व नियुक्तीचे ठिकाण हे तुम्हा सर्व कुटुंबियांना पुनश्चच एकत्र आणत आणत असलेले तुझ्यासह. सर्व कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन.

  4. सुनील,
    आत्ताची पदोन्नती व बढती नंतर सेवाकार्यासाठी मिळालेले ठिकाण–नासिक— पुनश्च तुम्हां सर्व कुटुंबियांना एकत्र येण्याकरिता अत्यंत लाभदायी ठरले आहे. तुझ्याबरोबरच तुम्हा सर्व कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन !!!!

  5. सुनील जी,
    सप्रेम नमस्कार
    आपण आता पुणे सोडून जात आहेत . वाईट वाटते.परंतू त्याचबरोबरीने आनंद हा की प्रमोशन सह गावी जात आहेत.त्यामुळे आई वडील ह्यांची सेवा देखील करता येईल.खुपच पुढील वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा,व आशीर्वाद .
    शाम मामा आळंदी देवाची

  6. रामकृष्ण पांडुरंग बडगुजर, दोंडाईचा (धुळे)
    May 19, 2022 at 11:42 am

    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !
    व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
    💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*