चोपडाः येथिल श्री. काशिनाथ पुंजू बडगुजरसर, पर्यवेक्षक,झि.तो.माध्यमिक विद्यालय,धानोरा,ता.चोपडा यांचा व्दितीय चिरंजीव गितेश हा सेंट जार्ज शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई,येथे प्रथम वर्षात विशेष प्राविण्यासह ७७ % गुण संपादन करून उत्तीर्ण झाला.
गितेश लहानपणा पासूनच हुशार असून त्याने इ.१० वीत ९७.४०% व इ. १२ वीत ८०% गुण संपादन केलेले,मोठ्याभावाचा आदर्श ठेवत चि.गितेश वैद्यकिय क्षेत्रात नशिब अजमावत आहे.मोठा भाऊ जयेश १० वी ९९.२०%(महाराष्ट्र राज्यात दुसरा ) व १२ वीत ८५% गुण संपादन केले होते व तो सध्या पुणे येथिल इनफोसीस कंपनीत कार्यरत आहे.
दोन्ही भावंडांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अ.भा.बडगुजर समाज महासमिती, वेब पोर्टल टीम, बडगुजर प्रॉऊड फाऊंडेशन, समस्त बडगुजर समाज, चोपडा वतीने गितेशचं कौतुक व अभिनंदन व पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा.
Leave a Reply