अभिनंदन 🌹त्रीवार अभीनंदन
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(MKCL) मार्फत इ.५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यासांठी “MKCL” आॕलिंपियाड मुव्हमेंट (MOM) राज्यस्तरिय स्पर्धा परिक्षा डिसेंबर २०२१ मधे घेण्यात आलेल्या परिक्षेत जामनेर येथिल आप्पासाहेब पुंडलीक भिकाशेठ बडगुजर,तलाठी यांचा नातू व श्री.संदीप पुंडलीक बडगुजर यांचा मुलगा ‘चि.भूषण ‘न्यू इंग्लिश स्कूल जामनेर हा इयत्ता ५ वी च्या गटातून,जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या क्रमाकांने दैदिप्यमान यश संपादन केले.
चि. भुषणच्या घवघवीत यशामुळे जामनेर येथे आनंदी वातावरण असून परीवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
👇MKCL बद्दल थोडक्यात 👇
५ वी ते ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी ‘MKCL ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा’
“प्रत्येक विद्यार्थ्याचे टॅलेंट शोधणारी विशेष ऑलिम्पियाड परीक्षा “
↕️
जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, Soft skills अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. ५वी ते ९वी तील SSC बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘MKCL ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२१ अर्थात ‘MOM’ ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. परीक्षेतील प्रश्नप्रकार आणि प्रश्नांचे स्वरूप हे जागतिक पातळीवरील मानकांनुसार तयार केले गेले होते.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर वेब पोर्टल टीम, बडगुजर प्रॉउड गृप तथा समस्त बडगुजर समाजातर्फे चि.भूषण व तसेच त्याच्या मातापित्यांचे हार्दिक अभिनंदन व यापुढेही असेच यश मिळो.
||⚜️🌹शुभम् भवतु🌹⚜️||
————————
Leave a Reply