||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
दिनांक 15 मे 2022 औरंगाबाद येथे महात्मा गांधी मिशनच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात होमिओपॅथीच्या इतिहासातील विक्रम घडवीत फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी वेगवेगळ्या विषयावर पुस्तके लिहून एकाच दिवशी तब्बल 28 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम घडविला होमिओपॅथी क्षेत्राच्या इतिहासात अशी ही पहिलीच घटना आहे यामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाथ्रीकर यांची दोन पुस्तके, डॉ. सूर्यकांत गिते यांची सहा पुस्तके, डॉ. रंजना देशमुख यांची दोन पुस्तके, डॉ. लीना गुंजाळ यांची दोन पुस्तके, तसेच डॉ. सोनाली पाथ्रीकर, डॉ. उन्मेश पाटील, डॉ. दौलत लहाने, डॉ. सुनिता लहाने, डॉ. रचना रांगणेकर, डॉ. सकीना नुरुद्दिन, डॉ. दयानंद हिंगोले, डॉ. मो. कदिर इब्राहिम,डॉ. अर्चना देशमुख, डॉ. रेखा बाहेती, डॉ. प्रतिभा मते, डॉ. नेहा थोरात डॉ. नाजनीन जागीरदार, डॉ. संजय पडोळे, डॉ. प्रशांत बडगुजर यांचे प्रत्येकी एक पुस्तक तसेच जरताब खान या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग,माजी उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे तसेच शिवा ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले. ही पुस्तके प्रकाशित करण्यात फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाथ्रीकर व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
परंस्नेही डॉ प्रशांत यांच्या पुस्तकाचे आवरण औरंगाबाद येथे झाले त्याबद्द्ल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations to Dr.Prashant Badgujar for Books Publish & Go Ahead💐🎉👌👍