पिंपळगाव हरेश्वर येथील पिंपळगाव बुद्रुक गुरुगोविंद विविध कार्यकारी सोसायटी लि. च्या संचालक पदी श्री बाळूशेट बडगुजर आणि श्रीमती जयश्रीताई बडगुजर यांची निवड झाली – श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर, पुणे

🌹हार्दिक अभिनंदन🌹 हार्दिक अभिनंदन🌹

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

सविस्तर वृत्त
पिंपळगाव हरेश्वर येथील पिंपळगाव बुद्रुक गुरुगोविंद विविध कार्यकारी सोसायटी लि. ची पंचवार्षिक निवडणूक आयोजित करण्यात आली होती या निवडणुकीत नम्रता पॅनल च्या वतीने आपल्या बडगुजर समाज बांधवांना प्रतिनिधित्व देण्यात आले होते. सदर निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 15 मे 2022 रोजी पार पडला. या चुरशीच्या निवडणुकीत नम्रता पॅनलचा घवघवीत विजय होऊन बडगुजर समाजातील श्री बाळू तुळशीराम शेठ बडगुजर आणि श्रीमती जयश्री ताई सुनील बडगुजर यांचा दणदणीत विजय झाला. या विजया निमित्त त्यांचे दोघांचे अखिल भारतीय युवक बडगुजर समिती, बडगुजर डॉट इन, बडगुजर प्राउड ग्रुप आणि बडगुजर युवा संघटन सुरत च्या वतीने तसेच जय चामुंडा माता हिरकणी ग्रुप यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन

दोघांना आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*