सौ. सारिकाताई महेंद्र पवार यांना एक्सप्रेस वूमेन इम्पोवरमेन्ट अवॉर्ड २०२२ देऊन गौरविण्यात आले – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

एक्सप्रेस मीडिया एटरप्राएझेस पिंपरी चिंचवड तसेच एक्सप्रेस वूमेन इम्पोवरमेन्ट अवॉर्ड- २०२२ हा सौ. सारिकाताई महेंद्र पवार यांना सन्मान चिन्ह हे श्री.पंडित अतुल शास्त्री भगरे याच्या हस्ते प्रदान करण्यात, यावेळी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे, राज्यसभा खासदार मा.सौ.वंदनाताई चव्हाण व अनेक मान्य वर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन हे एक्सप्रेस न्यूज नेटवर्क च्या संचालिका सौ. मनीषा थोरात व श्री.अधिकराव दिवे पाटील व सर्व टीम यांनी अतिशय खूप छान पद्धतीने नियोजन करून कार्यक्रम संपन्न केला .सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सौ.सारिकाताई महेंद्र पवार ह्या प्रत्येक समाज कार्य असू द्या कि पूर्णा नगर चिंचवड येथील सर्व सामाजिक कार्य हे कोणाला मदत करणे, कोणत्याही व्यक्तीला ला अडचण असेल तर ते वेळ काळ न बघता ते फक्त आणि फक्त मदत करत राहतात, कोरोना च्या काळात तर त्यांनी अहोरात्र कोरना व्यक्ती यांना मदत तर केलीच पण त्यांच्या घरातील कुटुंब यांना कसलीही अडचण भासू दिली नाही ( अंबुलन्स पासून तर त्या व्यक्ती घरी येई पर्यत सर्व प्रकारे त्यांनी मदत केली) त्या एकता महिला प्रतिष्ठान पूर्णांनगर च्या अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला ओ बी सी पिं. चि. शहर अध्यक्ष ही आहेत.
सौ. सारिका ताई महेंद्र पवार यांना सन्मान मिळाल्या बद्दल त्यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*