पिंपळकोठा येथील दीपक महेंद्र बडगुजर, याने नेपाळ येथे झालेल्या इंटरनॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप मध्ये यश संपादन करून आपल्या बडगुजर समाजाचे नाव आंतरराष्ट्रीय खेळात उंचावले आहे.
दीपकला लहानपणापासून कबड्डी तसेच इतर खेळांची आवड होती. पुढे शाळेमधून कबड्डी खेळतांना अनेक तालुका व जिल्हा स्पर्धा गाजवून त्याने आपले कौशल्य देखील सिद्ध केले. त्यादरमन गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. तेथे जिंकून विशेष कौशल्य दाखविल्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताकडून १९ वर्षांखालील (अंडर १९) गटात निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धा दिनांक १ मे ते ५ मे दरम्यान नेपाळ येथे पार पडली. तेथे फायनल मध्ये नेपाळ व भारताचा सामना झाला. भारतीय टीम मधील दिपकने उत्तम चढाई व आक्रमक कौशल्य दाखवीत या सामन्यात इतर टीम मेम्बर्स सोबत उत्तम प्रदर्शन करीत विजय मिळवला आणि भारताचा झेंडा नेपाळच्या धरतीमध्ये फडकवला.
या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक खेळाडूला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
दीपक हा डॉक्टर तेजस कोतवाल (दंत तज्ज्ञ), डोंबिविली यांचा भाचा असून त्यांनी दिपकला खेळ तसेच शिक्षणासाठी नेहमीच शैक्षणिक आणि आर्थिक प्रोत्साहन दिले. घरच्या हलाकीच्या परिस्थितीला तोंड देत दीपक ने मिळविलेले यश हे वाखाणण्याजोगे आहे.
पुढे प्रोफेशनल गटात कब्बडी खेळून प्रो कबड्डी लीग खेळायचा आणि बडगुजर समाजाचे नाव उंचावण्याचा दिपकचा मानस आहे. त्यासाठी समाजाने अश्या खेळाडूंना प्रोत्साहन करण्याची गरज आहे
Leave a Reply