||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
चि.गौरव शिंदे हा देशाचे माजी सैनिक श्री. संतोष श्रीधर शिंदे यांचा चिरंजीव मु गां. विरदेल तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हल्ली मुक्काम नाशिक देवळाली यांच्या ज्येष्ठ सुपुत्र त्याने आपले शालेय शिक्षण आर्मी स्कूल मध्ये देशातल्या विविध ठिकाणी घेतलेले व वेळोवेळी शिक्षणात तसेच क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केली. इयत्ता नववी मध्ये देवळाली कॅम्प येथे शिकत असताना त्याला स्काऊट गाईड मध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचा राज्य पुरस्कार देऊन ही गौरव विण्यात आले होते व त्याचे दहावी नंतरचे शिक्षण केंद्रीय विद्यालय एअर फोर्स स्टेशन देवळाली येथे आरंभ झाले.त्याने सायन्स या क्षेत्रात मध्ये शिक्षण घेतले, पुढे बारावी मध्ये असताना केंद्रीय विद्यालय मुंबई येथे सहभाग तर्फे पुणे रायफल शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यात मुंबई विभागातुन सर्वोत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल प्राप्त केले. पुढे एन. सी. सी. बिटको कॉलेज तर्फे पुणे येथे आयोजित केलेल्या एन. सी. सी. इंटर ग्रुप स्पर्धेत बिटको कॉलेज विजयी झाला व चि गौरव यांना मेडल देऊन गौरविण्यात आले त्या वेळी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च एन. सी. सी. चे सर्वोच्च अधिकारी व मंत्रालयाचे मंत्रीगण उपस्थित होते, नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप एन.सी. सी नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य एन.सी. सी संघाने उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली त्यांत चि. गौरव ह्याने सर्वोच्च कामगिरी बजावली व देशात प्रथम स्थान घेऊन गोल्ड मेडल प्राप्त केले. हा कार्यक्रम १ फेब्रुवारी २०२२ ला महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित पवार साहेब यांच्या महाराष्ट्र एन. सी. सी. संघाला तसेच चि,.गौरव शिंदे यास अवॉर्ड देऊन सन्मानित केले या कार्यक्रमास एन.सी.सी चे डायरेक्टर जनरल साहेब व मंत्रालयाचे माननीय सदस्यही उपस्थित होते.
तसेच आता पुढे पुढील वाटचाल करत भोपाळ येथे आयोजित झालेल्या इंडियन टीम सिलेक्शन साठी ट्रीअल्स मध्ये ऑल इंडियन एन. सी. सी. मध्ये फर्स्ट रँक आली तर देशातील खेळाडू मध्ये त्यांने टॉप ३० त्याने आपले स्थान प्राप्त केले या यश संपादन केल्या बद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडुन हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
चि गौरव याचे अभिनंदन.
इंजि. संदीप कोतवाल नाशिक यांनी छान लेख लिहिला आहे.