जळगाव ग. स. त भरघोस मतांनी निवडून द्या – श्री. पंकज बडगुजर यांचे सभासद समाज बांधवांना अवाहन

गेल्या महिनाभरापासनं जळगाव येथील ग. स. सोसायटीच्या निवडणुकीचे वाजणारे पडघम आता थंडावू लागले आहेत. दि. २८ एप्रिल २०२२ वार गुरुवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असल्या कारणास्तव शेवटचा प्रयत्न म्हणून चोपडा येथील शिक्षक श्री. पंकज विजय बडगुजर या अष्टपैलू नेतृत्वाला सर्व सभासद समाजबांधवांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

श्री. पंकज विजय बडगुजर हे ग. स. सोसायटीच्या निवडणुकीत ‘प्रगती शिक्षक सेना पॅनल’तर्फे उमेदवार असून ते बाहेरील मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा अ.क्र. १ असून त्यांची निशाणी ‘ढाल-तलवार’ आहे. तरी जळगांव ग. स. सोसायटीचे सभासद असणाऱ्या सर्व समाजबांधवांना विनंती व अवाहन करण्यात येत आहे की आपण सर्व मिळून आपल्या या बांधवास आपलं बहुमूल्य मत द्यावं व या शंभर वर्षांपेक्षा जास्त इतिहास असणाऱ्या आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पतपेढी म्हणून नावलौकिक असणाऱ्या या प्रतिष्ठित अर्थसंस्थेत संचालक म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती खुद्द पंकज बडगुजर यांनी केली आहे.

श्री. पंकज बडगुजर हे पारोळा येथील शिक्षक पतपेढीचे विद्यमान संचालक आहेत व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली छाप परिणामकारकपणे उमटवली आहे. बहुसंख्य समाजाचं नेहमीच वर्चस्व असणाऱ्या या निवडणूकीत आपल्या अल्पसंख्य समाजाचं प्रतिनिधीत्व श्री. पंकज बडगुजर करत आहेत. तरी अशावेळी एकजूट होऊया व त्यांना विजयी करण्याचा निर्धार करूया.

आई चामुंडा त्यांना यश देवो हीच सर्व समाजबांधवांतर्फे व बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे प्रार्थना !!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*