शिरपूर येथिल प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री . हिरालाल धोंडू बडगुजर यांच्यातर्फे त्यांच्या रहात्या घरी सुभाष कॉलनी येथे राम नवमी निमित्त खेतिया येथिल प्रसिद्ध सुंदरकांड मित्र मंडळाने अत्यंत सुंदर व मधुर आवाजात वेगवेगळ्या चाली लावून सुंदरकांड कथेचे सादरीकरण करण्यांत आले.
याप्रसंगी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य श्री . अनिल सुपडू बडगुजर , अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य श्री.धर्मेंद्र पोपटराव बडगुजर व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती माजी सचिव श्री. पंडीत शंकर बडगुजर ,श्री.संजय हिरामण बड़गुजर खेतिया उपस्थित होते . त्यांचा सत्कार श्री . हिरालाल शेट यांच्या कुटूंबियांकडून करण्यांत आला . तसेच सुंदरकांड मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री . विश्वनाथ पटेल . निशाल हरसोला – उपाध्यक्ष समाधान माळी – कोषाध्यक्ष किश्शार सोनी – सचिव
शिव कुळकर्णी , गुड्डू सोनी , शुक्लाजी , चौधरीजी, राजेंद्र येशिकर सदस्य यांचा बुके देऊन सत्कार त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यांत आला. याप्रसंगी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते . रात्री ८ ते ११ वाजे पर्यंत कार्यक्रम सुरु होता . नंतर महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेवती सुधाकर बडगुजर यांनी केले .
श्री . लोकेश बडगुजर भाऊ आपल्या बडगुजर इन च्या माध्यमातून श्री . हिरालाल धोंडू बडगुजर यांनी केलेल्या रामनवमी उत्सवाचे बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल हार्दिक आभार .