||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
लोहारी बु।।ता. पाचोरा ह.मु.इंदोर येथील श्री.प्रकाश सुकदेव बडगुजर यांचा मुलगा चि.सुरज प्रकाश बडगुजर याने २०१९ मध्ये भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (ऑल इंडिया आर. आर. बी.) जुनियर इंजिनिअर आपल्या बौद्धिक तेणे व कर्तुत्वाने ह्या अतिशय कठीण परिक्षेत यश संपादन करुन आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नाव रोशन केल्याचे दिसून येते आहे त्याच प्रमाणे चि. सुरज याच्या ह्या मेहनतीने भारतीय रेल्वेच्या उच्च पदाची नोकरी मिळाल्यामुळे मित्र मंडळीत नातेवाईक, आप्तेष्टांमध्ये अगदी आनंदाचे वातावरणात चि. सुरजचे भरभरून कौतुक करण्यात आले असून हार्दिक शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता त्याची रेल्वे विभागीय ट्रेनिंग पूर्ण होऊन W.R.Mumbai HeadQuarter, पश्चिम रेल्वे चर्चगेट द्वारा भावनगर डिव्हिजन मध्ये डिझायनर / ट्रेनिंग इंजिनियर म्हणून कार्यभार स्वीकारला.
चि. सुरज याने १० वी CBSC बोर्ड परिक्षेत९२% मार्क मिळवून उत्तीर्ण झाला होता, तसेच १२ वी CBSC बोर्ड परिक्षेत ९१% मार्क मिळवून उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर सुरजने मेडिकॅप युनिव्हर्सिटी इंदोर मधून BE, ME, SGSITS शिक्षण घेतले या यश प्राप्तीच्या पाठीमागे वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच माता चामुंडाचे आशिर्वादाने व समाजातील सर्व जेष्ठांचा आशिर्वाद लाभला आहे. अखिल भारतीय बडगुजर समाज ओबीसी समिती उप-प्रमुख श्री.एस्.एम् बडगुजर डोंबिवली,हे चि.सुरजच्या वडिलांचे काका व सुरजचे चुलत आजोबा आहेत. सुरजने आपल्या कुटुंबाचे व शालेसा परिवाराचे नांव रोशन केले आहे सुरजला पुढील वाटचालीसाठी भरभरून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
नोट : चि. सुरजला समाजातील होतकरु, मेहनती, विद्यार्थींना UPSC, RRB परिक्षेत फोकस करण्यासाठी मार्गदर्शन करावयास तयार आहे.
Leave a Reply