||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
धरणगाव येथील श्री. योगीराज सुकाशेठ बडगुजर यांचा नातू व श्री. सतीश योगराज बडगुजर, सौ. जयश्री सतीश बडगुजर यांचा चि. शुभम सतीश बडगुजर हा धरणगांव येथे गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये इयत्ता ४ थी कक्षेत शिक्षण घेत आहे. या शाळेचा वार्षीक पारितोषिक वितरण समारंभ हा श्री. लॉन मंगल कार्यालय,धरणगाव येथे दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव शहराचे पोलिस नि.श्री. अंबादास मोरे साहेब उपस्थित होते. चि.शुभम सतीश बडगुजर याला इयत्ता ४ थ्या कक्षेत सी बी एस सी अभ्यासक्रम च्या वर्ष २०२१-२२ मधील सर्वोकृष्ट विद्यार्थी ( Student Of The Year) म्हणून सन्मानित करण्यात आले. व चि.शुभम बडगुजर सोबत त्यांच्या आई, सौ. जयश्री बडगुजर, वडिल श्री. सतीश बडगुजर यांना स्टेज वर बोलवून त्यांना सुद्धा गौरवण्यात आले.
चि. शुभम याने त्यांचा कुटूंबाचे व समाजाचे नाव उंचावले. त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply