लोहारी येथील कुलस्वामिनी चामुंडा मातेची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम – चि. राहुल सुरेश बडगुजर सर धरणगांव

लोहारी बु.।।. ता. पाचोरा, जि.जळगांव.चामुंडा माता युवा संघटना यांचे कडून कळविण्यांस अत्यंत आनंद होत आहे की, अखिल भारतीय बडगुजर समाज, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व बडगुजर समाज बंधु आणि भगिनींना आपणांस कळवू इच्छित आहे की, लोहारी बु.।।. येथील श्री.नरेंद्र बडगुजर व बडगुजर समाज बांधवांच्या संकल्पनेतून लोहारी बु.।।. या गांवात आपली कुलदेवता माता चामुंडाचे मंदिर असावे ह्या संकल्पनेतून बघता बघता कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिराची भूमिपूजन, पायाभरणी व मंदिराची उभारणी होऊ घातलेल्या नियोजित कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण हा मंगलमय कार्यक्रम आज दिनांक १०/०३/२०२२ गुरुवार रोजी लोहारी बु.।।. गावातील सर्व बडगुजर समाज बांधवांची कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिरासमोर सभा घेण्यात आली.


सर्वानुमते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन या कार्यक्रमाचा मुहूर्मुहूर्तमेढ ठरवला गेला १५ एप्रिल पर्यंत मंदिराचे काम पूर्णत्वाला येणार आहे.आणि शाळेला सुद्धा सुट्ट्या लागतील या अनुषंगाने बाहेरील मान्यवर मंडळींना या कार्यक्रमास येणे सोयीचे व्हावे म्हणून दि. १५ मे २०२२ ते २२ मे २०२२ या कालावधी मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात ०७ दिवस भागवत कथा, व ०७ दिवस कीर्तन ०८ व्या दिवशी काला तसेच देवी भागवत गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ काकडा इत्यादी कार्यक्रम या आठ दिवसात आयोजित करण्यात आलेले आहेत तरी आजच्या सभेमध्ये सर्वानुमते हा निर्णय संमत करुन ठराव पास करण्यात आला बाकीच्या सर्व सूचना उदाहरणार्थ होम हवन पूजेला बसणारी मान्यवर मंडळी तसेच कीर्तन व भागवता साठी येणारे सन्माननीय अतिथी या बद्दल जाहीर निमंत्रण पत्रिका व सर्व माहिती १५ दिवस अगोदर कळवली जाईल असे ठरवण्यात आले तरी या सुवर्णमय व मंगलमय कार्यक्रमाला आपलं अनमोल सहकार्य मिळावं आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं ही नम्र विनंती आहे.


प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम दिनांक २० मे २०२२ शुक्रवार रोजी शुभ मुहूर्तावर नियोजित केलेला आहे नियोजित चामुंडा माता मंदिर पूर्णत्वाला जात आहे, तरी सर्व देणगीदारांनी दिलेले अनमोल सहकार्य त्या सह कार्याबद्दल चामुंडा माता युवा संघटना, तसेच बडगुजर समाज लोहारी बु.।।., आणि ग्रामस्थ मंडळी आम्ही सदैव आपले ऋणी राहू इच्छित आहोत
धन्यवाद!
संस्थापक अध्यक्ष- नरेंद्र बडगुजर


चामुंडा माता युवा संघटना अध्यक्ष – महेंद्र बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*