अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने बडगुजर “दिनदर्शिका प्रकाशन सोहळा” शिरपूर नगरीत थाटात संपन्न – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

        शिरपूर – अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीची मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या *शिरपूर नगरीत वैशिष्टपूर्ण अशा समाजाभिमुख “बडगुजर दिनदर्शिकेचे प्रकाशन”* गुजर भवन येथे महासमितीचे अध्यक्ष आनंदा भाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले.

           तसेच *महिलांचे स्नेहमिलन अर्थात हळदी-कुंकूचा* कार्यक्रमही झाला. यावेळी महासमितीचे पदाधिकारी, विविध मंडळांचे अध्यक्ष, शिरपूर समाज मंडळ व  महिला मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासमितीचे अध्यक्ष श्री आनंदाभाऊ सूर्यवंशी होते. दीपप्रज्वलन माजी अध्यक्ष श्री उमेश करोडपती व प्रतिमापूजन माजी अध्यक्ष श्री माधवराव बडगुजर यांच्या हस्ते झाले. *अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती निर्मित बडगुजर दिनदर्शिकेचा हेतू* स्पष्ट करणारे प्रास्ताविक महासमितीचे सचिव प्रा. एच.आर. बडगुजर यांनी केले.

          *अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने बडगुजर दिनदर्शिका प्रकाशित करण्याचे हे पहिले वर्ष आहे. यात बडगुजर समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक पैलू अधोरेखित करण्यात आले आहेत. चामुंडा मातेच्या पाच आरत्या कोणत्या दिवशी लागतील, ते त्या महिन्याच्या त्या त्या दिवशी नमूद केले आहे. समाजाच्या बोर्डिंग, मंगल कार्यालय, चामुंडा माता मंदिर यांचे वर्धापन दिन व यात्रा तसेच समाज वास्तूचे भूमिपूजन यांची नोंद या दिनदर्शिकेत करण्यात आली आहे. या सर्व वैशिष्ट्यामुळे हे कॅलेंडर समाजाभिमुख झाले असून ते संग्रही ठेवण्यासारखे झाले आहे,असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.*

         सन १९७९ मध्ये *महासमितीची स्थापना झाली, तेव्हापासून तर आजपर्यंतच्या संघटनात्मक वाटचालीची दखल या कॅलेंडरमध्ये घेण्यात आली आहे.* त्यात महासमितीचे अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ देण्यात आला आहे. तसेच समाज दिनदर्शिका निर्मिती मंडळ नमूद करण्यात आले आहे.

         प्रकाशन सोहळ्याचे उत्कृष्ट व मनोवेधक नियोजन केल्याबद्दल डॉ. श्री अतुल बडगुजर,  प्रा. डॉ. सौ. वृषाली बडगुजर, शिरपूर मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र बडगुजर यांच्यासह संपूर्ण टीमचे महासमितीकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

         समाज दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात महिला मंडळाचे सौभाग्य लेणे हळदी-कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.सौ. वृषाली बडगुजर व श्रीमती प्रतिभा अर्जुन बडगुजर  यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार महासमितीचे उपाध्यक्ष श्री दिलीप राघो बडगुजर यांनी मांडले.

         समाज दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी वरील मान्यवरांसह सहसचिव श्री भालचंद्र साळुंखे, संघटक श्री पी.डी. बडगुजर, माजी सचिव पंडित शंकर बडगुजर, माजी सचिव श्री राजेंद्र बडगुजर, माजी संघटक श्री हिरालाल दोडे, माजी महिला संघटक श्रीमती सुनंदाताई बडगुजर, ठाणे क्रांतिकारी मंडळाचे अध्यक्ष मोहन बडगुजर, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष बापू बडगुजर, अमळनेर मंगल कार्यालयाचे अध्यक्ष राजाराम बडगुजर, भुसावळ मंडळाचे अध्यक्ष सुरेश महाले, जळगाव बोर्डिंगचे अध्यक्ष लीलाधर बडगुजर, धुळे बोर्डिंगचे सचिव अशोक बडगुजर, पुणे मंडळाचे बी.डी.बडगुजर, खेतिया मंडळाचे अनिल सुपडू बडगुजर, एरंडोल मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, धुळे युवक मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर बडगुजर, कार्यकारिणी सदस्य प्रा. ईश्वर बडगुजर, श्री रवींद्र पंडितराव बडगुजर, धर्मेंद्र बडगुजर, विकास बडगुजर, रवींद्र संतोष बडगुजर, लोकेश कोतवाल, विजय बडगुजर, नवोदयचे अमित बडगुजर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*