||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
१५ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ११०४० गोंदीया कोल्हापूर ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर सुमारे सात वाजेच्या दरम्यान आली होती. यावेळी अनेक जण धावत्या रेल्वेच्या बोगीत चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सौ. सुनिता पांडुरंग बेडीस वय ५२ या आपल्या पतीसह त्या धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचा हात निसटून पाय घसरला. व रेल्वेने वेग धरला होता. यावेळी जळगाव पोलिस दलातील विशेष शाखेतील अंमलदार श्री. दिनेश बडगुजर हे आपले प्लॅटफॉर्मवरील कामकाज आटोपून बाहेर जाण्याच्या तयारीत असतांना त्यांचे या घटनेकडे लक्ष गेले. व लगेचच त्यांनी लगेच त्या गाडी कडे धाव घेतली, सौ. सुनिता बेडीस यांचा पाय धावती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या आत अडकला होता. त्याचवेळी प्रसंगावधान राखत बडगुजर यांनी तातडीने त्यांना बाहेर खेचून काढले, व त्यांचे प्राण वाचवले
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत करण्यात आले. श्री. दिनेश बडगुजर यांनी दाखवलेल्या कामगिरीची दखल घेत पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी प्रशस्तीपत्र देत त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित असलेले अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उप अधिक्षक (गृह) विठ्ठल ससे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी देखील त्यांचा सन्मान केला. आपल्या या कामगिरी बद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडुन हार्दिक अभिनंदन 🌹🌹
आपण खाली दिलेल्या लिंक वर त्या महिलेचे प्राण वाचवले तो व्हिडिओ बघू शकतात
Congratulations 🎉