||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
लोकनेते कै. अण्णासाहेब नथ्थू नामदेव बडगुजर सामाजिक प्रतिष्ठान बोराडी….
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
२० फेब्रू २०२२ सन्मान सोहळा
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
बोराडी येथे दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी कै. नथ्थू नामदेव बडगुजर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यात सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कै. तुकाराम नाना जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन मरणोत्तर जीवनगौरव ने सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद धुळेचे विद्यमान अध्यक्ष नामदार डॉ. तुषार रंधे यांचा कोरोना काळातील विशेष कार्याची दखल घेऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षिका म्हणून सौ. ज्योतीताई बडगुजर मुंबई यांचा सन्मान करण्यात आला यात कोरोना युद्धा, संपादक ,पत्रकार यांच्यासह मुंबई, बडोदा, बराणपुर, लोहारी, शिरपूर, धुळे , जळगाव पुणे, पाचोरा, फागणे, पिंपरी, अर्थे , अमळनेर सह नंदुरबार या समाज मंडळांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यात अण्णांच्या संकल्पानुसार चार विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अर्थसाह्य करण्यात आले. कै. नथ्थू नामदेव बडगुजर यांच्या जयंतीनिमित्त समाजाच्या विविध स्तरावरून प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दिली. कै. नथ्थू आण्णा यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाजबांधव मित्रपरिवार यांच्या ऋणात आम्ही सर्व राहू इच्छितो…. 🙏🙏
अण्णांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ज्या मान्यवरांना वेळेअभावी मत व्यक्त करण्यास संधी मिळाली नाही त्या सर्व जेष्ठ, श्रेष्ठ समाजबांधवांनी आपापले मत,अभिप्राय, प्रतिक्रिया सुचना लेखी स्वरूपात आमच्यापर्यंत WhatsApp च्या माध्यमातून या 9049655392 किंवा 9421524903 क्रमांकावर अथवा अन्य माध्यमातू पोहोच करावे…. आपल्या मतांचा व सूचनांचा आम्ही आदर करतो… यापुढेही करत राहू…. 🙏🙏
….आपलेच स्नेही….
अध्यक्ष व सर्व सदस्य वृंद लोकनेते कै. अण्णासाहेब नथ्थू नामदेव बडगुजर सामाजिक प्रतिष्ठान बोराडी
Leave a Reply