श्री. कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या आशिर्वादाने सुरत येथील बडगुजर युवा संघठन, अखिल भारतीय क्षत्रीय बडगुजर समाज ट्रस्ट सुरत, बडगुजर महिला शिक्षण समिती सुरत द्वारा दिनांक २०/२/२०२२ रविवार रोजी स्नेह मिलन व हळदी कुंकुच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम खूप गुण्या गोविंदाणे आनंदात पार पडला.कार्यक्रमात पुणे, सुरत,अहमदाबाद येथून महानुभव व्यक्ती उपस्थित होते.
बडगुजर युवा संगठन द्वारा आमंत्रित सर्व महानुभव समाज सेवकांचे भव्य असे शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प, व सन्मान प्रतिक देऊन स्वागत करण्यात आले.स्त्री सशक्तीकरण तसेच डिजिटल इंडीया वर छान असे विचार, वक्तव्य मांडण्यात आले.
पुणे येथिल बडगुजर प्राउड ग्रुप चे प्रतिनिधी श्री. विनोद श्रीराम मोहकर यांनी मार्गदर्शन पर आपल्या भाषणात समाज एकत्रित राहणे ही काळाची गरज आहे व आपण प्रत्येक समाज बांधवांनी व भगिनींनी सामाजिक कार्यक्रमास आवर्जून सहभागी होऊन आपल्यातील प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या कला, गुणांना व्यक्त करण्यासाठी सामाजिक व्यासपीठावर आपणांस मुफ्त पणे संधी मिळते. त्यामुळे आपण अशा कार्यक्रमास हिरीरीने भाग घेवा असे उपस्थितीतांना संबोधत आव्हान केले की, आपण ही आपल्या परीने समाजकार्य करत रहा तसेच शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली,
अहमदाबाद येथून श्री. जितेंद्र बडगुजर यांनी आपल्या वक्तव्यात युवा शक्तीचे महत्व सांगितले.
सरस्वती मिशन ठाणे द्वारा समाज कार्या साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
उपस्थित बडगुजर महिला शिक्षण समिती द्वारा हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यात आला तसेच भारतीय संस्कृती अशीच टिकून रहावी असा संदेश देण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. विजया ताई बडगुजर आणि श्री. अमोल बडगुजर द्वारा करण्यात आले.
उपस्थित सर्व पाहुण्यांचे बडगुजर युवा संगठन तसेच बडगुजर महिला शिक्षण समिती कडूनकार्यक्रमास उपस्थित बंधू आणि भगिनींचे खूप खूप आभार मानले.
आपली साथ अशीच कायम राहू द्या!
श्री.जीतूभाऊ आनंदाशेठ बडगुजर (अध्यक्ष) बडगुजर युवा संगठन यांनी सर्वं आलेले प्रमुख अतिथी व आलेले सर्व समाज बांधव व बघिनी यांचे आभार व्यक्त केले , अशीच एकजुटीने व आपले सहकार्य राहु द्या असे नमूद केले व कार्यक्रम नंतर स्नेह भोजनाचा आनंद घेऊन
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
श्री. विनोद श्रीराम मोहकर यांचा सत्कार करताना श्री. महेंद्र बडगुजर व उमेश बडगुजर
श्री. जितेंद्र बडगुजर यांचा सत्कार करताना श्री. श्रीकांत बडगुजर व नरेश बडगुजर
श्री. धर्मराज बडगुजर यांचा सत्कार करताना श्री. वासुदेव बडगुजर व नितीन बडगुजर
श्री. योगेश गिरनार PSI यांचा सत्कार करताना श्री. जितु बडगुजर व नरेश बडगुजर
श्री. प्रकाश भावसार यांचा सत्कार करताना श्री धर्मेश बडगुजर व श्री किशोर बडगुजर
एक पाऊल स्त्री सशक्तीकरणा कडे 👍