धुळे शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने स्व. आण्णासाहेब नथ्थू नामदेव बडगुजर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम व भव्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील विशेष कार्य करणाऱ्या समाज मंडळांचा सन्मान, कोरोना योध्दांचा गौरव, समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक २०/०२/२०२२ रविवार रोजी सकाळी १०:०० वाजता बोराडी येथील छत्रपती शाहू महाराज हॉल मध्ये ह्या हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील नाशिक महानगरपालिका विरोधी पक्षनेते (शिवसेना) मा.श्री.सुधाकर भाऊ भिका बडगुजर, मा. आमदार श्री. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, अ.भा. बडगुजर समाजाचे अध्यक्ष मा. श्री.आनंदा धोंडू सुर्यवंशी, उपाध्यक्ष दिलीप बडगुजर, माजी अध्यक्ष माधवराव बडगुजर,सतीदेवी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव पाटील, संपादक ईश्वर बडगुजर, राजेंद्र बडगुजर, प्रकाश बडगुजर, बडगुजर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बडगुजर, शिवाजी पाटील, हिरालाल बडगुजर, विकास बडगुजर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बडगुजर समाजातील विशेषकार्य करणाऱ्या समाज मंडळांचा सन्मान, कोरोना योध्दांचा कार्याचा सन्मान, समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा गौरव, करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकनेते स्व.आण्णासाहेब नथ्थू बडगुजर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बडगुजर व बोराडी येथील सातपुडा बडगुजर समाज मंडळ आणि महिला मंडळाने केले आहे. धन्यवाद!
कै.अण्णासाहेब यांच्या जयंती निमित्त याच ठिकाणी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते स्व . नथ्थू नामदेव बडगुजर सामाजिक प्रतिष्ठाणच्या आण्णासाहेबांच्या जयंती निमित्ताने होण्यार्या
कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा