जुन्या रूढीपरंपरा सारून बाजूला देवून विधवांना हळदीकुंकू नवोपक्रम राबवला – चि. रोहित बडगुजर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||


चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे खु ।।गावातील सर्व विधवा व निराधार महिलांन मध्ये नवचेतना निर्माण व्हावी व ‘सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे आपणही जिवन जगू शकतो ‘ ही भावना मनात दृढ व्हावी याकरिता ‘विधवा स्त्रियांचा हळदी कुंकू ‘ ह्या नवोपक्रम कार्यक्रमाचे आयोजन जि . प . बोरखेडे खु .॥शिक्षिका श्रीम. संयोगिता काशिनाथ शुक्ल (बडगुजर ) यांनी केले .
दि . १२ फेब्रूवारी २०२२ रोजी बोरखेडे खु ॥ येथे जून्या चालीरीती , रूढी परंपरा बाजूला करत विधवा व निराधार परित-त्या महिलांना स्टेजवर बोलवून सर्वांसमक्ष हळदीकुंकू व संक्रांतिचा वान देण्यात आले

बेटी बचाव – बेटी पढाव चा लोगो मेंहदीने सर्व उपस्थित महिलांच्या हातावर काढण्यात आला . तसेच उखाणे स्पर्धा घेवून वेगवेगळे खेळ घेवून त्यांच्या कलागुणाना वाव दिला व स्त्रियांमध्ये नवउर्जा , नव चैतन्य जागृत करण्यात आले . यात सर्व विधवा माहिलांनी उत्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून जून्या रढी परंपरा बाजूला सारून नव्या विचारांचा मोठ्या आनंदाने उत्साहाने स्विकार केला
ह्या वेळी महिलांच्या मुखावरील आनंद द्विगणीत झाल्याचे दिसून आले . त्याचप्रमाणे सर्व उपस्थित या कार्यक्रमाचे साक्षिदार झाल्याने अतिशय भारावून गेले . कार्यक्रमास २५० ते ३०० महिलांनी उपस्थिती होोती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बोरखेडे खु ॥ गावाच्या सरपंच पाटील ताई यांनी भुषवले . श्रीम शुक्ल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले . जि . प . शाळेचे मुख्या . श्री . प्रदिप जाधव सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . सौ विजया पाटील यांनी सक्षम स्त्रि यावर आपले विचार मांडले . श्री शरद पाटील ( पो . पा ) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले . आरोग्य सेविका सौ चंद्रकलाताई आंगणवाडी सेविका सौ . कलाताई , सौ विजयाताई यांचे अनमोल सहकार्य लाभले अशा प्रकारे अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*